शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस, सेंट्रल जी एस टी आणि इनकम टॅक्स, शिवशक्ती महिला संघ यांनी पटकावले अंतिम विजेतेपद

दादर:- शिवनेरी सेवा मंडळ, दादर येथे संपन्न झालेल्या कबड्डी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अंतिम फेरीचे सामने झाले. विशेष व्यावसायिक गटात महाराष्ट्र पोलीस संघाने विजेतेपद पटकावले. महिला गटात शिवशक्ती महिला संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. व्यावसायिक प्रथम श्रेणी मध्ये सेंट्रल जी एस टी आणि इनकमटॅक्स संघाने तर महाविद्यालयीन गटात वंदे मातरम कॉलेजने विजेतेपद पटाकावले.

विशेष व्यावसायिक गटात झालेल्या अंतिम फेरीचा सामना मध्यंतरा पर्यत चुरशीचा झाला. ११-१० अशी नाममात्र आघाडी महाराष्ट्र पोलीस संघाकडे होती. पण त्यानंतर बिपिन थले व महेंद्र राजपूत यांच्या खेळाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस संघाने महिंद्रा अँड महिंद्रावर दोन वेळा लोन टाकत ३२-१७ एकहाती मिळवत विजेतेपद पटकावले.

महिने गटात शिवशक्ती संघाने आपले वर्चस्व कायम ठेवत अमर हिंद मंडळावर अंतिम फेरीत ३२-२२ असा विजय मिळवला. शिवशक्ती संघाकडून रेखा सावंत, अपेक्षा टाकले व पूजा यादव यांनी उत्कृष्ट खेळ केला.

व्यावसायिक प्रथम श्रेणीत सेंट्रल जी एस टी आणि इनकम टॅक्स संघाने २८-१९ असा टी बी एम स्पोर्ट्स वर विजय मिळवळत अंतिम विजेतेपद पटकवले. सेंट्रल जी एस टी आणि इनकम टॅक्स संघाकडून भांगेश भिसे, गणेश जाधव व विजय दिवेकर यांनी उत्कृष्ट खेळ केला.

वंदे मातरम डोंबिवली संघाने ठाकूर कॉलेजवर विजय मिळवत अंतिम विजेतेपद पटकवले. मध्यंतरापर्यत १९-१० अशी ठाकूर कॉलेज कडे होती. मात्र मध्यंतरानंतर वंदे मातरम कॉलेज जोरदार प्रतिउत्तर देत सामना फिरवला. ४४-३९ ने सामना जिंकत वंदे मातरम संघाने विजेतेपद पटकावले.

विशेष व्यावसायिक गटात सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणजे महाराष्ट्र पोलिसच्या बिपिन थलेला सोनसाखळी देऊन गौरविण्यात आले. तर महिला गटात शिवशक्तीच्या पूजा यादवला सोन्याची नथ व देवीची साठी देऊन गौरविण्यात आले. व्यावसायिक प्रथम श्रेणी मध्ये सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून आयकर संघाच्या भागेश भिसे याला सोनसाखळी देऊन गौरविण्यात आले. तर महाविद्यालयीन गटात वंदे मातरमच्या धीरज तरे सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली.

संक्षिप्त निकाल:-

विशेष व्यावसायिक:

विजेतेपद- महाराष्ट्र पोलीस

उपविजेता- महिंद्रा अँड महिंद्रा

तिसरे स्थान- भारत पेट्रोलियम व एयर इंडिया

सर्वात्कृष्ट चढाईपटू– सौरभ कुलकर्णी (महिंद्रा)

सर्वात्कृष्ट पकडपटू– रोहित बने (महाराष्ट्र पोलीस)

मालिकवीर– बिपिन थले (महाराष्ट्र पोलीस)

Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

व्यावसायिक प्रथम श्रेणी:

विजेतेपद– सेंट्रल जी एस टी आणि इनकम टॅक्स

उपविजेता– टी बी एम स्पोर्ट्स

तिसरे स्थान– भारत पेट्रोलियम (शिवडी) व शिवास एंटरप्राइज

सर्वात्कृष्ट चढाईपटू– चेतन पाटील (टी बी एम)

सर्वात्कृष्ट पकडपटू- विजय दिवेकर (जी एस टी आणि आयकर)

मालिकवीर– भागेश भिसे (जी एस टी आणि आयकर)

Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

महिला गट:

विजेतेपद– शिवशक्ती महिला संघ

उपविजेता– अमर हिंद मंडळ

तिसरे स्थान– डॉ. शिरोडकर स्पो. क्लब व विश्वशांती क्रीडा मंडळ

सर्वात्कृष्ट चढाईपटू– श्रद्धा कदम (अमर हिंद)

सर्वात्कृष्ट पकडपटू– प्रतीक्षा तांडेल (शिवशक्ती)

मालिकवीर– पूजा यादव (शिवशक्ती)

Photo Courtesy: Dinesh Ghadigaonkar

महाविद्यालयीन गट:

विजेतेपद– वंदे मातरम कॉलेज, डोंबिवली

उपविजेता– ठाकूर कॉलेज

तिसरे स्थान– सिद्धार्थ कॉलेज व महर्षी दयानंद कॉलेज

सर्वात्कृष्ट चढाईपटू– भरत करंगुटकर (ठाकूर कॉलेज)

सर्वात्कृष्ट पकडपटू– मेहुल पंडम (ठाकूर कॉलेज)

मालिकवीर- धीरज तरे (वंदे मातरम)

 

 

 

You might also like