भारत आणि इंग्लंड संघामध्ये ४ ऑगस्ट पासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दुसरे पर्व देखील सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांचे या मालिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या मालिकेबद्दल विविध प्रतिक्रिया सध्या व्यक्त होत आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नॉटिंगहॅममध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने या मालिकेत भारतीय संघ विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अख्तरने भारतीय वेगवान गोलंदाजांना देखील एक सल्ला दिला आहे.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध आक्रमक गोलंदाजी करण्याचा सल्ला अख्तरने दिला आहे. याचबरोबर त्याने असेही म्हटले आहे की, इंग्लंडला घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे नक्कीच थोडा फायदा होईल.
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अख्तर म्हणाला की, ‘इंग्लंड संघाच्या गोलंदाजांना अधिक संधी आहे, विशेष म्हणजे जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर. अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील इतिहास आपल्या सर्वांना माहित आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने इंग्लंडला नक्कीच फायदा होइल.’
वेगवान गोलंदाजांबाबत अख्तर म्हणाला, ‘वेगवान गोलंदाजांची आक्रमकता ही त्यांच्या लेंथवर अवलंबून असते. लोकांना असे वाटते की मी आक्रमक होतो, कारण मी बाउंसर गोलंदाजी करायचो. पण, ते तसे नाही. मी आक्रमक होतो कारण मी चेंडू योग्य ठिकाणी, योग्य वेगाने टाकायचो आणि त्या वेगात विविधता देखील आसायची. त्यामुळे जो कोणी इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी कसोटी खेळणार आहे. त्यांनी फक्त खूप आक्रमकता ठेवा आणि खूप वेगाने डेकला हिट करायचे आहे, हे लक्षात ठेवा. हा बदल संपूर्ण वेळ करत रहा, ते सर्वात महत्वाचे आहे.’
शोएब अख्तरने भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांबद्दल बोलताना म्हणाला की, ‘जर तुम्हाला एकदा आक्रमक लेंथ मिळाली तर, ती सोडून नका. तुम्ही हे निश्चित करायची गरज आहे की तुमचा सामना फलंदाजांशी नाही, तर तुमच्या बुद्धीशी आहे. हे माझे कौशल्य आहे जे तुम्हाला तेथून बाहेर काढू शकेल, अशीच मानसिकता गोलंदाजांची असायला पाहिजे. हे त्या लोकांसाठी नाही, ज्यांनी तुमची खराब कामगिरी अजूनही लक्षात ठेवलेली आहे. तुम्ही जर वाईट दिवस मनात धरून ठेवलात, तर तो तुमचा सर्वात वाईट शत्रू आहेत, जे तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी देत नाही. तुम्हाला तुमची उत्कृष्ट कामगिरी दाखवायची असेल, तर तुम्हाला कष्टातून जावे लागणार आहे.’
ही मालिका ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची तयारी सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीकाकारांना उत्तर देण्याची मोठी संधी सॅमसनने गमावली, माजी भारतीय क्रिकेटरने व्यक्त केली निराशा
रिषभ पंतने ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीशी संबंधीत खास घटनेचा केला खुलासा, म्हणाला…