भारताचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik)याने त्याच्या कारकिर्दीतील चौथ्याच टी20 सामन्यात मोठा विक्रम नोंदवला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात एक चेंडू तब्बल 155 किमी प्रतितास वेगाने टाकला. यामुळे तो भारताकडून सर्वाधिक वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी हा विक्रम जसप्रीत बुमराह याच्या नावावर होता. त्याचा हा वेग पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर चिंतेत पडला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याच्याच नावावर आहे. त्याने 2003च्या विश्वचषकादरम्यान इंग्लंडविरुद्ध जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. तेव्हा त्याने 161.3च्या गतीने चेंडू टाकला होता. त्याने एका माध्यमाशी बोलताना म्हटले, “मला आनंद होईल जर त्याने (उमरानने) माझा विक्रम मोडला तर, मात्र त्याच्या नादात तो आपल्या बरगड्या तर तोडणार नाही ना. त्याने फिट राहावे हीच इच्छा.” हे बोलल्यावर अख्तर हसत होता.
उमरानला जेव्हा तू अख्तरचा विक्रम मोडण्याबाबत प्रश्न विचारला होता, तेव्हा त्याने मी नशीबवान असेल तर मी नक्कीच हा विक्रम मोडेल. उमरान आयपीएलमध्ये प्रभावशाली गोलंदाजी करत चर्चेत आला होता. त्याचा वेग आधीपासूनच अधिक असून सध्या तो सरळ रेषेत गोलंदाजी करण्यावर भर देत आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात उमरानने 4 षटके टाकताना 27 धावा देत 2 विकेट्सही घेतल्या होत्या. या सामन्यात त्याने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याला तो वेगवान चेंडू टाकला होता. त्यामध्ये सामन्याच्या 16.4 थ्या चेंडूवर शनाका चांगला शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता, मात्र युझवेंद्र चहल याने उत्तमरित्या तो झेल टिपला. शनाकाची विकेट भारतासाठी महत्वाची होती. तो 27 चेंडूत 45 धावा करत बाद झाला.
हा सामना भारताने शेवटच्या चेंडूवर अवघ्या दोन धावांनी जिंकला. यामुळे हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
(Shoaib Akhtar in tension after seeing Umran Malik speed Said, ‘On the verge of breaking my record…’)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी क्रमवारीत हार्दिकसोबत भारताच्या ‘या’ चार खेळाडूंना फायदा, स्मिथने बाबरला टाकले मागे
स्टीव स्मिथने उद्ध्वस्त केला दिग्गज डॉन ब्रॅडमनचा विक्रम, विराट अन् रुटही पाहतच राहिले