पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला वाटते की, भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या सर्वांपेक्षा वेगळ्या गोलंदाजी ऍक्शनमुळे क्रिकेटच्या सर्व प्रकारात अधिक काळ खेळू शकणार नाही. बुमराहची क्रिकेटच्या सर्व प्रकारातील गोलंदाजी सरासरी २०च्या आसपास आहे. त्याने १४ कसोटी सामन्यात ६८ विकेट्स घेतल्या आहेत. तर, ६४ वनडे सामन्यात १०४ आणि ४९ टी२० सामन्यात ५९ विकेट्स घेतल्या आहेत. Shoaib Akhtar Said That Jasprit Bumrah Has Unique Action So He Can’t Play In All Formats Of Cricket
अख्तर माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबत त्याच्या यूट्यूब शो आकाशवाणीमध्ये बोलताना म्हणाला, “बुमराहजवळ वेगळी गोलंदाजी ऍक्शन उपलब्ध आहे. पण त्यामुळे तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळू शकत नाही. हे बुमराहमधील धाडस आहे की, त्याने कसोटी सामन्यात त्याचे कौशल्य दाखवले. तो खूप मेहनती आणि लक्ष क्रेंदित करणारा मुलगा आहे. त्याला माहिती आहे की, त्याला नक्की कुठे जायचे आहे. पण, त्याची पाठ त्याच्या या जबाबदारीचे ओझे सांभाळू शकेल का?”
२०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बुमराहने त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावर लवकरच तो जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपाला आला.
पण सप्टेंबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले होते. या सामन्याची आठवण काढत अख्तर म्हणाला की, “बुमराहच्या पाठीला दुखापत होण्यापुर्वी मी त्याचे सामने पाहत होतो. मी माझ्या मित्राला म्हणाला होतो की, बुमराहच्या पाठीला दुखापत होणार.”
“माझे मित्र मला म्हणाले होते की, तो ४-५ पावले दूर जाऊन चेंडू टाकण्यासाठी आला आणि असे घडले. पण मी त्यांना म्हणालो की, त्याच्या पावलांचा काही संबंध नाही. तर, त्याच्या डिलिव्हरी स्ट्राईडच्या लोडिंगमुळे असे घडले. त्याची पाठ इतका वेळ तग धरू शकली नाही. मला वाटते की, १-२ कसोटी सामन्यांनंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली. त्याला खूप सावधान राहण्याची गरज आहे आणि त्याच्या कर्णधारालाही काळजी घेण्याची गरज आहे. कारण त्याच्यासारखी प्रतिभा असणारे खूप कमी खेळाडू मिळतील,” असे पुढे बोलताना अख्तर म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ पंतने ‘या’ दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज
या दिग्गजाचा गजब खुलासा, ‘दुखापतीमुळे केला होता ३८० धावांचा विश्वविक्रम’
ट्रेंडिंग लेख –
एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर
वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा