माजी भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममधून जात आहे. मागच्या दोन वर्षांपासून एकही शतक करू न शकलेल्या विराट कोहलीची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. सचिनच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला नेहमीच दावेदार मानले गेले आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता ही गोष्ट कठीण वाटत आहे. असे असले तरी, पाकिस्तानी दिग्गज शोएब अख्तरला मात्र खात्री आहे की, तो नक्कीच सचिनचा हा विक्रम मोडेल.

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याच्या मते विराट कोहली (Virat Kohli) जरी सध्या खराब फॉर्ममध्ये असला, तरी तो ११० शतके करू शकतो आणि वयाच्या ४५व्या वर्षापर्यंत खेळू देखील शकतो. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, “तुम्ही विराट कोहलीविषयी चांगल्या गोष्टी बोलता. त्याला इज्जत द्या. तुम्ही त्याला सन्मान का देत नाहीत. एक पाकिस्तानी असल्याच्या नाते मी असे म्हणतो की, तो क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक आहे. मी पैज लावू शकतो की, तो ११० शतक करेल.”

अख्तरने विराटला एक खास संदेश देखील दिली. तो पुढे बोलताना म्हणाला की, “तुला कोणालाच घाबरण्याची गरज नाहीये. तुला वयाच्या ४५ वर्षांपर्यंत खेळायचे आहे. सध्याची परिस्थिती तुला ११० शतक करण्यासाठी मजबूत बनवत आहे. लोक तुझ्याविषयी चर्चा करत आहेत आणि तुझ्या विरोधात ट्वीट देखील केले जात आहेत. तुझ्या पत्नीविषयी आणि मुलांविषयी देखील ट्वीट केले जात आहेत. यापेक्षा वाईट बाब काहीच असू शकत नाही. परिस्थिती तुला ११० शतक करण्यासाठी तयार करत आहे.”

दरम्यान, आयपीएल २०२२ हंगामात विराटने आरसीबीच्या कर्णधाराची जबाबदारी घेतली नव्हती. तो फक्त फलंदाजाच्या रूपात खेळला, पण तरीदेखील चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. त्यांचा संघ प्लेऑमध्ये पोहोचला, पण अंतिम सामन्यात मात्र त्यांना संधी मिळाली नाही. विराट आता थेट इंग्लंड दौऱ्यात खेळताना दिसू शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत त्याला विश्रांती दिली गेली आहे. विराटसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसणार नाहीत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ ५ तगड्या खेळाडूंवर असेल सर्वांची नजर, पाहा यादी

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने निवडली आयपीएल प्लेइंग इलेव्हन, विजेत्या संघातील ‘या’ ३ शिलेदारांना दिली संधी

अलविदा केके | प्रसिद्ध भारतीय गायकाचा चालू कार्यक्रमात मृत्यू, क्रिडाविश्वातूनही व्यक्त होतेय हळहळ