भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या वाढदिवशी(15 नोव्हेंबर) तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने त्याच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. परंतु चाहत्यांनी मलिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
वास्तविक, सानियाने प्रथम शोएबबरोबरचा एक फोटो शेअर केला होता आणि त्याखाली लिहले होते की, ‘वाढदिवसाला दिलेल्या सुखद धक्क्याबद्दल धन्यवाद.’ यानंतर शोएबनेही हाच फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला.
शोएबने फोटोखाली लिहलेले कॅप्शन हे सानियाने तिच्या पोस्ट खाली लिहिल्या कॅप्शन सारखेच होते. म्हणजेच कायतर शोएबने सानियाच्या पोस्टवरचं सगळं काही कॉपी पेस्ट केलं होत. यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. कमीतकमी स्वतःच नाव तरी बदलायचं होतं, असा सल्ला देण्यास सुरूवात केली. शोएब आणि सानियाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CHpnqMJl4Vn/
वाढदिवसानिमित्त सानिया पोहोचली पाकिस्तानात
15 नोव्हेंबरला सानिया मिर्झाचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सानिया तिचा नवरा शोएबला भेटायला पाकिस्तानला गेली होती आणि पाकिस्तान सुपर लीग सामन्यात स्टेडियममध्ये येऊन सामन्याचा आनंद लुटतानाही ती दिसली. वास्तविक शोएब पीएसएल क्वालिफायरमध्ये पेशावर झल्मी संघाच्या वतीने खेळत होता. अशा परिस्थितीत सानिया आपल्या नवऱ्याला चिअर्स करण्यासाठी एलिमिनेटर 1 मधील सामन्यात कराची स्टेडियमवर पोहोचली होती.
युवराजने दिल्या हटके शुभेच्छा
त्याचबरोबर सानिया मिर्झाच्या वाढदिवशी तिला भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने देखील शुभेच्छा दिल्या, जो चर्चेचा विषय बनला होता. युवीने सानियाला ‘मिर्ची मॉमी’ म्हणून संबोधित केले होते.
2010 मध्ये सानियाने शोएब मलिकशी लग्न केले होते. त्या दोघांना 30 ऑक्टोबर 2018 ला मुलगा झाला. त्याचे नाव इझहान मिर्झा मलिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट एकटाच दोन खेळाडूंच्या बरोबरीचा! ऑस्ट्रेलियन दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने
ऑस्ट्रेलियामध्ये कसून सराव करणाऱ्या खेळाडूंवर ‘या’ व्यक्तीची आहे करडी नजर
ज्या दिवशी सचिन मैदानावर रडला, त्याच दिवशी सचिनला लाराने भेट दिली होती खास वस्तू
ट्रेंडिंग लेख –
ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन