---Advertisement---

कालच बाप झालेला शोएब मलिक आज क्रिकेटच्या मैदानात

---Advertisement---

काल पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला पुत्ररत्न झाले. यामुळे या दोनही दिग्गज खेळाडूंवर सध्या कौतूकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या मुलाचे नाव एजहान मिर्झा मलिक असे ठेवण्यात आले आहे.

त्यात आज पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेला सुरुवात होत आहे. ही मालिका दुबई आणि आबू धाबी येथे होत आहे. यात ३ टी२०, ३ वन-डे आणि ३ कसोटी सामने होणार आहे.

पाकिस्तानच्या टी२०संघात शोएब मलिकचा समावेश करण्यात आला आहे. १५ खेळाडूंच्या संघाचे कर्णधारपद सर्फराझ अहमदकडे आहे.

आज पहाटे या टी२० मालिकेसाठी शोएब मलिक आबूधाबीला रवाना झाला. तसेच तो आज लगेचच हा सामना आबूधाबीत खेळणार आहे.

यामुळे देशाप्रती दाखवलेल्या प्रेमामुळे मलिकवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. १००पेक्षा जास्त टी२० सामने खेळलेला शोएब मलिक हा एकमेव खेळाडू आहे. त्याने १०५ सामन्यात ३१.६६च्या सरासरीने २१५३ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत २८ विकेट्सदेखील घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी सामन्याने होणार राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला सुरवात, यावर होणार थेट प्रेक्षपण !

२०१८मध्ये राशिद खानला मागे टाकण्याची कुलदिपला संधी

विंडीज संघाचे केरळात नारळपाणी देत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत, पहा व्हिडिओ

कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले

देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment