क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कसोटी कर्णधार ब्रायन बूथ यांचे शनिवारी (दि. 20 मे) निधन झाले आहे. ब्रायन बूथ 89 वर्षांचे होते. ब्रायन यांच्या निधनाची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावरून दिली आहे. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते तसेच क्रिकेटप्रेमीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ काय म्हणाले?
खरं तर, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी कसोटी कर्णधार ब्रायन बूथ हे मधल्या फळीतील फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या पहिल्या घरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्यांच्या निधनाने मोठा झटका बसला आहे. अशातच नुकतेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी बूथ यांचे कौतुक केले.
Cricket Australia is today mourning the loss of former Test captain Brian Booth MBE.
Our thoughts are with the family of the 89-year-old, who was not only a much-loved middle-order batter, but also represented Australia at the Olympics in hockey. May he rest in peace. pic.twitter.com/IywYUYwvOB
— Cricket Australia (@CricketAus) May 20, 2023
हॉकले म्हणाले की, “ब्रायन यांनी संपूर्ण क्रिकेट जगत आणि त्याच्या बाहेर खूपच सन्मान आणि प्रशंसा मिळाली. आम्ही त्यांच्या पत्नी जूडी आणि त्यांचे कुटुंब, मित्रपरिवारासाठी मनापासून संवेदना व्यक्त करतो. 50 हून कमी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे आणि त्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत ब्रायन यांचे नाव सामील आहे. त्यांचे आयुष्य असाधारण राहिले आहे आणि दु:खद बाब अशी की, त्यांची उणीव भासत राहील. क्रिकेटमधील त्यांचे योगदान हे एक प्रेरणा बनले आहे. त्यांची नेहमी आठवण काढली जाईल.”
याव्यतिरिक्त क्रिकेट एनएसडब्ल्यूचे सीईओ ली जरमोन यांनीही म्हटले की, त्यांचा शांत स्वभाव लोकांच्या स्मरणात नेहमी राहील. ते म्हणाले की, “आम्ही ब्रायन बूथ यांच्या निधनाने खूपच दु:खी आहोत. खेळाच्या मैदानावर एका नेत्याच्या रूपात ब्रायन यांच्या विक्रमांची इतिहासात नोंद आहे. तसेच, मायदेशातील ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियासाठी हॉकी खेळायचे, हे दाखवून देते की, ते एक ऍथलिट म्हणून किती खास होते.”
ब्रायन बूथ यांची कारकीर्द
ब्रायन बूथ (Brian Booth) यांनी 29 वेळा ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी 19645-66दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या ऍशेज मालिकेतील दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्वही केले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 29 कसोटी सामन्यात 42.21च्या सरासरीने 1773 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 183 सामन्यातील 283 डावात फलंदाजी करताना 45.42च्या सरासरीने 11265 धावा केल्या होत्या. यामध्ये 26 शतके आणि 60 अर्धशतकांचाही समावेश होता. नाबाद 214 ही त्यांची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या होती. (shocking former australian test cricketer brian booth died at age of 89)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीविरुद्ध भिडण्यापूर्वी धोनीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! चेन्नईचा कोचच म्हणाला, ‘तो 100 टक्के…’
याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये पंजाबच्या शतकवीराचा ‘असा’ काढला काटा, Video