पाकिस्तान आणि इंग्लंड या संघात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळवला गेेला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 74 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानला शेवटच्या दिवशी 343 धावांचे आव्हान मिळाले होते. त्याआधी कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी असा एक प्रकार घडला, ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली. रावळपिंडी कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जो रुट याने डावखुऱ्या हाताने फलंदाजी केली. आता त्याच्या याच कृतीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज चांगलाच भडकला आहे. अख्तर नाराजी व्यक्त करत म्हणाला की रुटने आमची खिल्ली उडवली आहे आणि पाकिस्तान संघानेे आपल्या खेळाने याचेे प्रत्युत्तर द्यावे.
शोएब अख्तर (Shoiab Akhtar) याने आपल्या यू-ट्यूब चॅनल,”इंग्लंडने आमची खिल्ली उडवली आहे. जो रुट (Joe Root) हा डावखुऱ्या हाताने खेळतोय, हे बघाताना विचित्र वाटले. पाकिस्तान संघाने आता 3.5 च्या रनरेटने धावा केल्या पाहिजेत. जर पाकिस्तान संघ इंग्लंडला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर त्यांचा विश्वास वाढेल आणि इंग्लंडचा आत्मविश्वास तुटेल जे पाकिस्तानी संघाला हलक्यात घेत आहेत. ”
पुढे शोएब म्हणाला की जर इंग्लंडला हरवण्याची ताकद पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये दिसली तर ते सामना जिंकू शकतात. शोएबने पाकिस्तान संघाला बेझबॉल खेळण्याचा सल्ला दिला आहे. रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शोएबनेे म्हणाला की, “जर हा सामना पाकिस्तान संघानेे जिंकला तर इंग्लंडला समजेल की त्यांनी डाव घोषीत करुन चूक केली. जर इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकला तर ही गोष्ट नक्की खरी असेल की ते सामना ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरलेच नव्हते. त्यांचा हेतू हा सामना जिंकण्याचा किंवा हारण्याचाच होता.”
पाकिस्तान आणि इंग्लंड या संघात रावळपिंडी येेथे पहिला सामना खेळवला गेला. या सामन्याात इंग्लंडने पाकिस्तानवर 74 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या डावात 264 धावांवर आपला डाव घोषीत केला. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात 579 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात विजयासाठी आवश्यक 343 धावांचा पाठलाग करताना 268 धावांवर संघ सर्वबाद झाला आणि पाकिस्तानला 74 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.(Shoiab Akhtar angered on Joe Root that he humiliated Pakistan by playing lefty)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला ‘डबल ट्रबल’! लाजिरवाण्या पराभवानंतर खेळाडूंच्या खिशालाही लागली कात्री; आयसीसीने केली कारवाई
आपल्याच खेळाडूला कोट्यावधी कमावण्यापासून रोखत आहेत ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक, वाचा संपूर्ण प्रकरण




