बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत तिसऱ्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंचे शानदार प्रदर्शन कायम राहिले. भारताचा अनुभवी गोळाफेकपटू तजिंदरपालसिंग तूर याने सुवर्णपदक जिंकत आपले विजेतेपद राखले. तर, भारताची स्टीपलचेस धावक पारुल चौधरी हिने अनपेक्षित पणे अनेक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत सुवर्णपदकावर कब्जा केला.
Asian Record Holder @Tajinder_Singh3 becomes the latest entrant of 🇮🇳's Gold Medal Club at the Asian Athletics Championships 2023 🥳
The #TOPSchemeAthlete produced a throw of 20.23m in Men's Shot Put Final Event & secured 🥇for 🇮🇳
Well done Champion! Keep making 🇮🇳 proud 🥳👏 pic.twitter.com/KGp3SkFQzA
— SAI Media (@Media_SAI) July 14, 2023
तूर याने मागील स्पर्धेत देखील सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. मात्र, यावेळी तो आपले विजेतेपद राखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील वर्षी दुखापतीमुळे बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी न झालेला तूर या स्पर्धेत शानदार कामगिरी करताना दिसला. त्याने 20.30 मीटर इतका गोळा फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. यासह 2018 एशियन गेम्स, 2019 आशियाई चॅम्पियनशिप व आता पुन्हा एकदा आशियाई चॅम्पियन होत त्याने ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली.
Parul Chaudhary grabs another🥇for 🇮🇳 at the Asian Athletics Championships 🥳
The NCOE @SAI_Bengaluru camper clocked a time of 9:38.76 in Women's 3000m Steeplechase Final to mark this feat.
Keep shining Parul! More power to you💪🏻👏 pic.twitter.com/O1U9YJxGN6
— SAI Media (@Media_SAI) July 14, 2023
मे महिन्यात अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी स्टीपलचेसर पारुल चौधरी हिने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी नोंदवली. तिने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करताना भारताच्या पदकांमध्ये वाढ केली. तर भारताची युवा लांबउडीपटू शैली सिंग हीने देखील आपले पहिले आंतरराष्ट्रीय पदक पटकावताना रौप्य पदकाची कमाई केली. त्याचवेळी भारताच्या तीन खेळाडूंना आपापल्या क्रीडा प्रकारांमध्ये अंतिम फेरीत चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
भारतीय संघाची आतापर्यंत स्पर्धेतील कामगिरी शानदार राहिली आहे. भारतीय पथकाने आतापर्यंत पाच सुवर्ण, एक रौप्य पदक व तीन कांस्य पदकांची कमाई करत पदक तालिकेत तिसरे स्थान पटकावले. या यादीमध्ये जपान व चीन अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत.
(Shot Putter Tajinderpal Singh Toor And Steeple Chaser Parul Chaudhary Won Gold Medal In Asian Athletics Championship 2023)
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण विभाग दुलीप ट्रॉफी विजयाच्या दिशेने! कवीरप्पाच्या 7 बळींनी मोडले पश्चिम विभागाचे कंबरडे
BREAKING । भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! डिसेंबर-जानेवारीत तीन मालिकांचे आयोजन