आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2025) आयोजन पाकिस्तानकडे आहे. पण भारतीय नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी येणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) कळवले आहे. आता हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेचे आयोजन करणे हा एकमेव मार्ग उरला आहे, पण पाकिस्तान त्यासाठी तयार नाही. या सर्व बाबींचा विचार करता भारताच्या सामन्यांसाठी ही स्पर्धा पाकिस्तान सोडून दुसरीकडे आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. हे सर्व वाद सुरू असतानाच भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देवने (Kapil Dev) मोठे वक्तव्य केले आहे.
कपिल देव (Kapil Dev) यांना एका कार्यक्रमात भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जावे का, असा प्रश्न विचारला असता, ते यावर समाधानी दिसले नाहीत. ते म्हणाले की, याबाबत सरकारच निर्णय घेईल. या विषयावर आमच्यासारख्या लोकांचे मत महत्त्वाचे नाही.
माजी भारतीय दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) एका कार्यक्रमात म्हणाला, “तुम्ही मला हा प्रश्न विचारणे फारच अयोग्य आहे, कारण ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार सर्व काही ठीक आहे असे म्हणत असेल तर सर्व काही ठीक आहे आणि आमच्यासारख्या लोकांनी आमचे मत देऊ नये. जेव्हा देश काही ठरवतो तेव्हा आमच्या मताला काही फरक पडत नाही. कपिल देव इतर कोणापेक्षा मोठे असू शकत नाहीत.”
#WATCH | On the venues of the Champions Trophy and Pakistan vs India probable match, former captain, Indian cricket team, Kapil Dev says, “…It’s the govt responsibility. People like us should not give opinions, our opinions don’t matter. Kapil Dev can’t be bigger than anyone… pic.twitter.com/RqgAW7meGz
— ANI (@ANI) November 17, 2024
कपिल देवच्या (Kapil Dev) आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 131 कसोटी सामन्यातील 227 डावात कपिल देवने 434 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत, तर 184 डावात फलंदाजी करताना त्याने 31.05च्या सरासरीने फलंदाजी करताना 5,248 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 27 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत.
कपिल देवने 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर सोबतच त्याने 3,783 धावा देखील केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 175 राहिली आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 14 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? विराट कोहलीसह ही नावं चर्चेत
देवदत्त पडिक्कलला संधी मिळणार? शमीबाबत बोर्डाची स्पष्ट भूमिका; टीम इंडियाचे सर्व अपडेट जाणून घ्या
पाकिस्तानी चाहत्यांनी भर मैदानात बाबर आझमची लाज काढली, ट्रोल करतानाचा VIDEO व्हायरल