---Advertisement---

कोहलीला त्रिफळाचीत करणारा गोलंदाजही झाला थक्क, पहा व्हिडिओ

On: बुधवार, एप्रिल 3, 2019 6:02 PM
---Advertisement---

जयपूर। मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. हा सामना राजस्थान संघाने 7 विकेट्सने जिंकत या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. राजस्थानकडून या सामन्यात तीन विकेट्स घेणारा श्रेयस गोपाळ सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

त्याने या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स आणि शिमरॉन हेटमेयर या महत्त्वाच्या फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या. त्याने या तीन विकेट्स चार षटकात 12 धावा देत घेतल्या.  त्याने जेव्हा विराट कोहलीला बाद केले तेव्हा तो स्वत: थक्क झाला होता.

त्याने या सामन्यातील सातव्या षटकाच्या तीसऱ्या चेंडूवर गुगली टाकत विराटला त्रिफळाचीत केले. त्यावेळी विराटला बाद केले असल्याचा त्याला स्वत:वर विश्वास बसेना. हा व्हि़डिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर करण्यात आला आहे. विराटने या सामन्यात 25 चेंडूत 23 धावा केल्या.

या सामन्यानंतर पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना गोपाळ म्हणाला, ‘एकाच सामन्यात कोहली आणि डिविलियर्सची विकेट घेणे हे कोणत्याही युवा गोलंदाजासाठी स्वप्नासारखे आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा सर्वोत्तम क्षण आहे आणि आयपीएलमधील सर्वोत्तम क्षणांपैकी हा आहे. तसं पाहिले तर कोणतीही विकेट ही मोठीच असते, पण ही दोन नावे खूप मोठी आहे. मला आता स्वत:ला शांत ठेवावे लागेल.’

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 158 धावा केल्या होत्या आणि राजस्थान रॉयल्स समोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान राजस्थानने 19.5 षटकात सहज पार केले. राजस्थानकडून जॉस बटलरने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएल २०१९: आज चेन्नईच्या तीन स्टार खेळाडूंना खास विक्रम करण्याची सुवर्णसंधी

२००७ विश्वचषकात खेळलेले हे ५ खेळाडू खेळणार २०१९ विश्वचकातही

कर्णधार अजिंक्य रहाणेला स्टिव्ह स्मिथचा खास सल्ला, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment