---Advertisement---

स्टाईल मारायला गॉगल घालून आला, शून्यावर बाद होऊन तंबूत परतला! भारताच्या स्टार खेळाडूची फजिती

---Advertisement---

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आपल्या अनोख्या स्टाईलनं चर्चेत आला. मात्र खेळपट्टीवर त्याची ही स्टाईल फार काळ टिकू शकली नाही. तो भोपळाही न फोडता बाद होऊन तंबूत परतला.

वास्तविक, दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात इंडिया ‘डी’ संघाचा कर्णधार अय्यर फलंदाजी करण्यासाठी गॉगल घालून आला होता. त्याची ही स्टाईल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. पहिल्या डावात अय्यर केवळ 7 चेंडूंचा सामना करू शकला. तो शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, ज्यानंतर त्यांची ट्रोलिंग सुरू झाली. या सामन्यात वेगवान गोलंदाज खलील अहमदनं एका फुल लेंथ चेंडूवर श्रेयस अय्यरची विकेट घेतली. तो मिडऑनला झेलबाद झाला.

राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या श्रेयस अय्यरची कामगिरी गेल्या काही सामन्यांपासून फारशी चांगली झालेली नाही. त्यानं पहिल्या सामन्याच्या दोन डावात अनुक्रमे 9 आणि 54 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्यानं अर्धशतक झळकावलं असलं, तरी तो क्रिजवर संघर्ष करताना दिसला होता. अशा परिस्थितीत त्याच्या फलंदाजीच्या तंत्रावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

श्रेयस अय्यर त्याच्या खराब फलंदाजीपेक्षाही गॉगल लावून केलेल्या फलंदाजीमुळे सोशल मीडियावर ट्रोल होतोय. अय्यर शून्यावर बाद झाल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. चाहते त्याच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ट्विटरवर एका चाहत्यानं म्हटलं की, “संघातून बाहेर पडल्यानंतरही श्रेयस गॉगल लावून फलंदाजी करतोय. कदाचित तो आता क्रिकेटला गांभीर्यानं घेत नसेल!”

 

काही चाहत्यांनी श्रेयसच्या स्टाईलवरून त्याची टिंगल उडवली. श्रेयस अय्यरची कारकीर्द त्याच्या कामगिरीपेक्षा त्याच्या स्टाईलमुळे जास्त लक्षात राहिल, असं चाहते म्हणत आहेत.

हेही वाचा – 

सर्व 11 खेळाडूंनी मिळून फलंदाजाला घेरलं, अशी फिल्डिंग कधी पाहिली का? ; व्हिडिओ व्हायरल
बांग्लादेशला हरवण्यासाठी पाकिस्तानचा माजी प्रशिक्षक भारतीय संघात; चेन्नईत जोरदार तयारी
पाकिस्तानी गोलंदाजाने मोडला भुवनेश्वर कुमारचा ऑलटाइम रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---