---Advertisement---

श्रेयस अय्यर करतोय पुनरागमानासाठी जोरदार तयारी, एकाच दिवसात तोडल्यात दोन बॅट, पाहा फोटो

On: गुरूवार, जुलै 22, 2021 7:30 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. तो लवकरात लवकर मैदानात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यासाठी त्याने जोरदार तयारीही सुरु केली आहे. विशेष म्हणजे त्याने प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. याच सरावाच्या दरम्यान श्रेयसने एका दिवसात दोन बॅट देखील तोडल्या आहेत.

एक फोटो श्रेयसने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रेयस आपले प्रशिक्षकांसोबत दिसून आला आहे. तर दुसऱ्या फोटो मध्ये दोन तुटलेल्या बॅट दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील नियमित खेळाडू असलेला श्रेयस अय्यर रॉयल लंडन चषक स्पर्धेत लँकशायरचे प्रतिनिधित्व करत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यास त्याला अजून काही कालावधी लागणार असल्याने त्याने या स्पर्धेतून माघार घेतली.

Photo Courtesy: Instagram/Shreyas Iyer

या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. श्रेयसने नुकतीच नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे.

श्रेयस अय्यर इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटलचा नियमित कर्णधार आहे. पण त्याला आयपीएल 2021 स्थगित होण्यापूर्वी स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. पण, सप्टेंबरमध्ये सुरु होणाऱ्या उर्वरित आयपीएल 2021 हंगामावेळी तो खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यरने भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय आणि टी20 सामने खेळले आहेत. त्याने 10 डिसेंबर 2017 रोजी एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाविरुद्ध पदार्पण केलं होते. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1 नोव्हेंबर 2017 ला न्यूझीलंड संघाविरुद्ध पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ही’ चूक केली नसती, तर आयपीएलमध्ये दीपक चाहरला लागली असती २ कोटींची बोली, वडिलांनी व्यक्त केली खंत

SL vs IND: तिसऱ्या वनडे सामन्यात होऊ शकतात ४ मोठे बदल; ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

द्रविडच्या ‘या’ मास्टरस्ट्रोकमुळे भारतीय संघाने मिळवला विजय, भुवनेश्वर कुमारने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---