---Advertisement---

चाहत्यांचे प्रेम पाहून वनडे मालिकेतून बाहेर गेलेला श्रेयस अय्यर झाला भावनिक, म्हणाला…

On: गुरूवार, मार्च 25, 2021 3:26 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात मंगळवारी (२३ मार्च) पुणे येथे झालेला पहिला वनडे सामना यजमानांनी ६६ धावांनी जिंकला. फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत भारताने पाहुण्यांचे मनसुबे उधळत मालिकेची दमदार सुरुवात केली. मात्र सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने श्रेयस अय्यर उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. यानंतर श्रेयसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या डावाच्या ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने फटका खेळला. तो चेंडू आडवण्यासाठी श्रेयसने उडी मारली. पण त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी तो वेदनेने कळवतानाही दिसला. त्याला नंतर मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले.

त्यानंतर त्याचा खांदा निखळला असल्याचे, तसेच त्याचे स्कॅन करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. पुढे त्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसून आल्याने त्याला पुढील काही आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्याचमुळे तो २६ आणि २८ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यांना मुकणार आहे.

यानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींनी त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. चाहत्यांचे आपल्याप्रती असलेले प्रेम पाहून, श्रेयस भावनिक झाला. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत लिहिले आहे की, ‘मी तुम्हा सर्वांचे संदेश वाचत आहे. सर्वजण म्हणत आहेत की, भारतीय संघाला जितका मोठा धक्का बसला, तितकेच दमदार पुनरागमनही होईल. तुमचे माझ्यावरील प्रेम आणि समर्थन पाहून मी भारावून गेलो आहे. अगदी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार. मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन भारतीय संघात परतेल.’

https://twitter.com/ShreyasIyer15/status/1375008173485006849?s=20

श्रेयस आयपीएल २०२१ मधून बाहेर होण्याची शक्यता

श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्याकारणाने तो येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२१ च्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. श्रेयस गेल्या ३ हंगामापासून दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या २ हंगामात दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तसेच मागील वर्षी अंतिम सामनाही गाठला होता.

पण आता त्याच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाचे नेतृत्त्व कोणाकडे सोपवले जाणार हे पाहावे लागेल. सध्या दिल्ली संघात रिषभ पंत, स्टिव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे, आर अश्विन असे नेतृत्वासाठी काही पर्याय आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा

कसा आहेस भावा? रिषभच्या प्रश्नावर रोहितचा अश्लील इशारा; व्हिडिओ होतोय व्हायरल

अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---