---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचे शिलेदार जिममध्ये घेतायेत मेहनत; फोटो केले शेअर…

---Advertisement---

सर्व फ्रँचायझी संघ आयपीएल 2020 ची तयारी करत आहेत. कधीकधी खेळाडू मैदानात सरावात घाम गाळतात, तर कधी व्यायाम करतात. त्याच वेळी, खेळाडू कधीकधी सौम्य शैलीतही दिसतात.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने शिखर धवनसोबतचा एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत दोन्ही खेळाडूंनी शर्ट घातलेले नाही. हा फोटो शेयर करताना श्रेयसने ‘जिम टीम’ हे कॅप्शन दिले आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने अद्याप आयपीएलमध्ये एकही विजेतेपद मिळवले नाही. अशा परिस्थितीत युएईमध्ये संघाचे मुख्य लक्ष आयपीएलचा खिताब मिळवणे हेच असेल. खेळाडू नेट व जिममध्ये जोरदार मेहनत घेत आहेत.

दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएलचे वेळापत्रक 6 सप्टेंबरला जाहीर झाले. गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना 19 सप्टेंबरला आबुधाबी येथे गतवर्षीचे उपविजेते असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाशी होणार आहे.

भारतातील कोव्हिड- 19 च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) तीन ठिकाणी, दुबई, आबु धाबी आणि शारजाह येथे यावर्षी जगातील सर्वात मोठी टी20 लीग आयपीएलचे आयोजन होत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दुसर्‍या दिवशी दुबईमध्ये समोरासमोर असतील. 21 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी शारजाहमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि सीएसके यांच्यात खेळला जाईल.

https://www.instagram.com/p/CFG9Q9zpULG/?utm_source=ig_web_copy_link

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार एकूण दहा दिवस दोन-दोन सामने खेळले जातील. त्यापैकी पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता व दुसरा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

दुबईत एकूण 24 सामने होणार आहेत. आबू धाबीमध्ये 20 आणि शारजाहमध्ये 12 सामने खेळले जातील. आयपीएल 2020 प्ले ऑफची जागा नंतर जाहीर केली जाईल. अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी होईल. ही स्पर्धा एकूण 53 दिवस चालणार आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हंगाम ठरेल.

दिल्ली कॅपिटल्स संघ-

श्रेयस अय्यर (कॅप्टन), कगिसो रबाडा, मार्कस स्टोईनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डॅनियल सॅम्स, अ‍ॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल , तुषार देशपांडे, एनरिच नॉर्टज, ऋषभ पंत, हर्षल पटेल, केमो पॉल, अमित मिश्रा.

महत्त्वाच्या बातम्या-

-टीम इंडियाच्या या खेळाडूच्या पत्नीला हवीय सुरक्षा, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका…

-आरसीबीच्या ‘या’ फिरकीपटूला करायची आहे, अंतिम षटकात गोलंदाजी, कारण जाणून थक्क व्हाल…

-मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय

ट्रेंडिंग लेख-

-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान

-किंग्ज ११ पंजाब संघाला विजेतेपद जिंकून देण्याची क्षमता ठेवणारे ३ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---