Ranji Trophy: भारतीय संघाच्या स्टार फलंदाजाने इंडिया अ कडून खेळण्याऐवजी रणजी सामने खेळण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे तो मुंबई विरुद्ध आंध्रप्रदेश यांच्यात होणाऱ्या रणजी सामन्यात खेळताना दिसेल.
त्याचे झाले असे की श्रेयस अय्यरची भारतीय टी20 संघात अफगाणिस्तानविरुद्ध निवड झाली नाही. तसेच भारतीय संघ लवकरच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याच पार्श्वभूमीवर श्रेयस अय्यरने मुंबई रणजी संघाकडून सामने खेळण्यास प्राधान्य दिले आहे.
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरचा(shreyas iyer) रणजी ट्रॉफी(ranji trophy) मध्ये पुढे होणाऱ्या सामन्यासाठी मंगळवारी मुंबई संघात समावेश केला आहे. 12 ते 15 जानेवारी मुंबईचा दुसरा सामना आंध्र विरुद्ध खेळणार आहे. मुंबई संघ पहिला सामन्यात बिहार विरुद्ध जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत तेथील असलेल्या आव्हानात्मक परिस्थितीनुसार फलंदाजीसाठी खुप संघर्ष केल्यानंतर उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यर 25 जानेवारीला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी फॉर्ममध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहे. (Shreyas Iyer named in Mumbai squad for Andhra match )
रणजी ट्रॉफीत श्रेयशला स्थान
श्रेयसला सर्फराज खानच्या जागी स्थान देण्यात आले आहे. सर्फराजला अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध होण्याऱ्या सामन्यात भारत ‘अ’ टीम मध्ये निवडले आहे. दरम्यान,मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा देखील रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार नाही. तो 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध टी20 मालिकेत खेळताना दिसेल. रणजी ट्रॉफीचा तब्बल 41 वेळा विजेता असलेल्या मुंबई संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बिहारला एक डाव आणि 51 धावाने मात दिली होती. संघाचा कर्णघार अजिंक्य राहणे दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेचा दौरा ठरला वाईट
दक्षिण आफ्रिके(ind vs sa) विरुद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत श्रेयस अय्यर भाग होता आणि त्याने चारही डावात फलंदाजी केली. पहिल्या डावात चांगली सुरुवात मिळवली होती, परंतू तो लवकर बाद झाला. दुसऱ्या डावात पण असमाधान कारक फलंदाजी केली आणि दुसऱ्या सामन्यात सुद्धा तेच हाल झाले. यादरम्यान दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यानी चौकार मारुन संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा
“भारताच्या वनडे आणि टी20 संघात ‘हा’ खेळाडू खूप महत्त्वाचा”, युवा फलंदाजाबद्दल माजी क्रिकेटपटूचं विधान
‘फक्त या कारणांमुळे झाला टीम इंडियाचा पराभव’, भर पत्रकार परिषदेत कोचने सांगितले कारण