भारतीय संघाने न्यूझीलंड संघासमोर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाला २३४ धावा करण्यात यश आले होते. या सामन्यात पदार्पण करत असलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक, तर दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. यासह तो पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक आणि अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. तसेच चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याने एक मोठा खुलासा केला आहे.
श्रेयस अय्यरने सामन्यातील दुसऱ्या डावात १२५ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ६५ धावांची खेळी केली. तसेच चौथा दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो म्हणाला की, “राहुल द्रविड सरांनी मला अधिकाधिक चेंडू खेळण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांच्या सल्ल्यानुसार फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला असे वाटले होते की, पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर २५० धावा देखील भरपूर असतील म्हणून आम्ही जिथे आहोत तिथे खुश आहोत.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “खरंतर आज खेळपट्टीवर काही विशेष घडत नव्हतं, चेंडू थोडा खाली येत होता. मला वाटते की ही खरोखर चांगली धावसंख्या आहे. आमच्याकडे फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळे आम्ही हे काम नक्कीच पूर्ण करू अशी आशा आहे.”
भारतीय संघाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तो पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतक आणि अर्धशतक झळकावणारा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा तो शिखर धवन आणि रोहित शर्मा नंतर तिसराच फलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात १७० धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
सारा तेंडुलकरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणारा वनराज झवेरी आहे तरी कोण? घ्या जाणून
Video: शार्दुल ठाकूरने मुंबईत उरकला साखरपुडा, पाहा कोण आहे त्याची होणारी बायको
“रिषभ आमचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू, तो उपलब्ध नसल्यास वृद्धिमान साहाची गरज भासते”