---Advertisement---

श्रेयसने वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत निवड समितीवर साधला निशाणा! लिहिले, “मेहनतीची…”

On: सोमवार, सप्टेंबर 30, 2024 9:35 PM
shreyas iyer workout
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा उजव्या हाताचा फलंदाज श्रेयस अय्यर सध्या संघाचा भाग नाही. बांगलादेशविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. याशिवाय अय्यरसह इशान किशनलाही वर्षाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केंद्रीय करारातून वगळले होते. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने पुनरागमन केले असले तरी त्याला आपले स्थान कायम राखता आले नाही. तसेच त्याला केंद्रीय करारही परत मिळू शकला नाही. याच दरम्यान सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक खास व्हिडिओ शेअर केला गेल. या व्हिडिओमध्ये तो कठोर कसरत करताना दिसत होता. मात्र, त्याचे कॅप्शन बरेच काही सांगून जात होते.

श्रेयसने त्याच्या नवीन व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये इंग्रजीमध्ये लिहिले की, ‘मेहनतीची जागा कोणी घेऊ शकत नाही.’ याचाच अर्थ जिंकण्यासाठी तुम्ही मेहनत केली तर त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. आता त्याच्या कॅप्शनचा अर्थ बाहेर येत आहे, त्यामुळे तो आपल्या अशा बोलण्याने बीसीसीआयला टार्गेट करत होता की काय, असा अंदाज येऊ शकतो.

श्रेयस अय्यर सध्या भारताच्या कसोटी आणि टी20 या दोन्ही संघांमधून बाहेर आहे. तर या वर्षी एकही एकदिवसीय सामना होणार नाही. याचाच अर्थ आता तो कदाचित टीम इंडियाच्या सध्याच्या निवड समितीच्या नजर येत नाही. बांगलादेशविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठीही त्याला डावलले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyasiyer96)

नुकत्याच झालेल्या दुलिप ट्रॉफीमध्येही त्याच्या बॅटमधून विशेष काही पाहायला मिळाले नाही. इंडिया डीकडून खेळताना अय्यरने सहा डावांत केवळ 154 धावा केल्या होत्या. श्रेयसकडे आता स्वतःला सिद्ध करण्यासाठी इराणी ट्रॉफी ही पहिली संधी असेल. त्यानंतर आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत तो मुंबई संघाचा भाग बनल्यास, तिथे पुनरागमनासाठी प्रयत्न करताना दिसेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘मला स्वत:चा अभिमान’, 300 कसोटी विकेट्स पूर्ण केल्याने जडेजाची प्रतिक्रिया
कोहली की रूट? न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य!
कोहली आणि पंतमध्ये पुन्हा वाद! धाव काढताना गोंधळ उडाल्याने थोडक्यात बचावला विराट, मग…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---