इंडियन प्रीमियर लीगचा १५ हंगाम गुजरात टायटन्सच्या नावावर राहिला. पदार्पणच्या हंगामात गुजरातने विजेतेपद पटकावले. आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-२० मालिका खेळायची आहे. पाच सामन्यांची ही मालिका ९ जूनपासून सुरू होणार असून भारताचा प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेसाठी तयारीला लागला आहे. त्याने एक खास व्हिडिओ शेअर करून याविषयी माहिती दिली आहे.
आयपीएल २०२२मध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. त्याने या हंगामात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये त्याने ४०१ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी ३०.८४ होती, तर स्ट्राईक रेट १३४.५६ होता. त्याचे वैयक्तिक प्रदर्शन जरी चांगले राहिले असले, तरी त्याचा संघ मात्र अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. केकेआरने हंगामात खेळलेल्या १४ सामन्यांपैकी फक्त ६ सामने जिंकले. गुणतालिकेत त्यांचा संघ १२ गुणांसह ७ व्या स्थानावर होता.
आयपीएल हंगाम कोणत्याही बाधेशिवाय पार केल्यानंतर आता श्रेयस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी तयार आहे. त्याने या मालिकेसाठी तयारी देखील सुरू केली आहे. स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून त्याने सराव सत्रातील एक छोटासा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. व्हिडिओत श्रेयस चांगल्या लयीत दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “बॅक टू द ग्राउंड.” चाहत्यांकडून यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
https://www.instagram.com/p/CeaoFsDJZ6U/
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी मालिकेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. मागच्या वर्षी देखील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विराट विश्रांतीवर होता आणि त्यावेळी श्रेयसने तिसऱ्या क्रमांकावर अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये श्रेयसने १७४.३५च्या स्ट्राईक रेटने २०४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या तीन अर्धशतकांचा समावेश होता. अशात आता आगामी मालिकेत देखील विराटच्या अनुपस्थितीत श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर धमाका करताना दिसू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला नाही वाटत रोहितला विश्रांतीची गरज आहे’, ‘हिटमॅन’च्या माजी संघसहकाऱ्याचे मोठे विधान
‘ही एक अद्भूत कसोटी, कर्णधारपदाची पर्वा न करता…’, विजयी पताका फडकवल्यानंतर स्टोक्सने मांडल्या भावना
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दम दाखवला, तर ‘या’ भारतीय खेळाडूंची विश्वचषकात जागा फिक्स?