इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतर येत्या १९ सप्टेंबर पासून इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामाच्या उर्वरित सामन्यांना प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा युएईमध्ये पार पडणार आहे. तसेच ही स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर देखील युएईला पोहचला आहे. त्याने आगामी हंगामासाठी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. तसेच रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळण्याबाबत त्याने मोठा खुलासा केला आहे.
यावर्षी इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला क्रिकेटपासून काही काळ दूर राहावे लागले होते. तसेच त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातून देखील माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे त्याच्याऐवजी रिषभ पंतला संघाचे नेतृत्वपद देण्यात आले होते. परंतु, तो आता पूर्णपणे फिट झाला आहे. ज्यामुळे रिषभ पंत ती श्रेयस अय्यर, कोणाला कर्णधारपद देण्यात यावे, याबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. परंतु, अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच २०१९ हंगामात दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
दरम्यान त्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “दुर्दैवाने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. परंतु त्यामुळेच मला आणखी एक संधी मिळाली आहे. मी एक खेळाडू आणि संघाला समजून घेणाऱ्या चाहत्यांसाठी वाटेल ते करायला तयार आहे.”
जेव्हा त्याला संघाच्या नेतृत्वाबाबत विचारण्यात आले,तेव्हा त्याने सरळ उत्तर देण्याचे टाळले. तो पुढे म्हणाला की, “गेल्या २ वर्षात आमच्या संघाने योद्ध्यांसारखी कामगिरी केली आहे. हे आम्ही सेट केलेल्या प्रक्रिया आणि प्रणालीमुळेच शक्य झाले आहे. मी संघ व्यवस्थापकांचे आभार मानतो की,त्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवला. यामुळेच मला संघासाठी योगदान देता आले.”
“दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केल्यामुळे मी एक हुशार क्रिकेटपटू झालो आहे. मला या खेळातील गोष्टींना आणि परिस्थितीला वेगळ्या नजरेने पाहता आले आहे. यामुळे माझ्या स्वभावात देखील खूप बदल जाणवला आहे,” असे श्रेयस अय्यर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
अबुधाबीतील मोठी स्पर्धा गाजवताना दिसणार डू प्लेसिस; ‘या’ संघाचा बनला आयकॉन आणि कर्णधार
गावसकरांनी चौथ्या कसोटीच अतिरिक्त फलंदाज खेळवण्याचा दिल्ला सल्ला, पण विराट म्हणाला…
गरजू खेळाडूंना प्रारंभीच्या काळात आर्थिक मदत करा – तेजस्विनी सावंत