चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्युझीलंड विरुद्ध भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा (15) शुबमन गिल (2) आणि विराट कोहली (11) धावांवर बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेल सोबत भागीदारी रचली. अय्यरने त्याचे अर्धशतक 75 चेंडूत पूर्ण केलं.
श्रेयस अय्यरने अक्षर पटेल सोबत 136 चेंडूत 98 धावांची भागीदारी केली. त्याआधी विराट, रोहित आणि शुबमन तिघेही 30 धावांवर बाद झाले होते. त्यानंतर मंद गतीने खेळून खेळाडूंना बाद होण्यापासून वाचवायचे होते. त्यामुळे श्रेयसने त्याच्या करिअरमधील सगळ्यात मंद गतीने अर्धशतक पूर्ण केल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रेयस अय्यरने 75 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या वनडे करिअरमधील हे सगळ्यात हळू गतीने केलेलं अर्धशतक होत. या आधी त्याचं सगळ्यात हळू अर्धशतक 2022 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध अहमदाबाद मध्ये झालं होतं तेव्हा त्याने 74 चेंडूत अर्धशतक केलं होतं.
श्रेयस अय्यरने 98 चेंडूत 79 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली. या पारीमध्ये त्याने 2 षटकार आणि 4 चौकार मारले. तसेच तो एक मोठा शॉट खेळताना कॅच आऊट झाला. तेव्हा भारतीय संघाचा स्कोर 172/5 होता.
वनडे क्रिकेट मध्ये भारतासाठी सर्वात मंद गतीने अर्धशतक करणारा फलंदाज एम.एस धोनी आहे. त्याने 2 जुलै 2017 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध त्याच अर्धशतक 108 चेंडू मध्ये पूर्ण केलं होतं. या सामन्यात त्याने 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्या बद्दल बोलायचे झाल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत यांचे स्थान पक्के केले आहे. आज जो संघ जिंकेल त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तसेच जो संघ आज पराभूत होईल त्या संघाचा सामना उपांत्य फेरीत साऊथ आफ्रिका संघाशी होईल.






