भारतीय संघाचा युवा विस्फोटक फलंदाज शुबमन गिल हा वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकला आहे. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात स्पर्धेचा 33वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारत नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरला. यावेळी भारताचा सलामीवीर शुबमन गिल याने टिच्चून फलंदाजी केली, पण तो शतक झळकावण्यास हुकला. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील सातवे शतक ठरले असते.
शतकासाठी 8 धावा पडल्या कमी
भारतीय संघाच्या डावातील 30वे षटक दिलशान मदुशंका टाकत होता. यावेळी तिसऱ्या चेंडूवर शुबमन गिल (Shubman Gill) स्ट्राईकवर होता. यावेळी त्याने तिसरा चेंडू निर्धाव खेळला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. पाचव्या चेंडूवरही गिलने 2 धावा काढल्या. मात्र, अखेरच्या चेंडूवर मागील दिशेने शॉट मारण्याच्या प्रयत्नात गिलने विकेट गमावली. त्यामुळे त्याला शतकाला मुकावे लागले.
विशेष म्हणजे, भारताच्या डावातील पहिले षटकही मदुशंकाच टाकत होता. त्यानेच रोहित शर्मा (Rohit Sharma) याला दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद केले होते. रोहित 2 चेंडूत 4 धावा करून बाद झाला होता. शुबमन गिल यावेळी 92 चेंडूत 92 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता.
A superb 92-run knock by Shubman Gill comes to an end!
A fine innings that from the #TeamIndia opener 👏👏
India 193/2 after 30 overs. #CWC23 | #MenInBlue | #INDvSL pic.twitter.com/tfotB5X7Fa
— BCCI (@BCCI) November 2, 2023
शतक हुकलं, पण विक्रम नावावर
यावेळी शुबमन गिल शतक करण्यासाठी मुकला असला, तरीही त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. अर्धशतक करताच गिल वनडे क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात सर्वाधिक 12 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने पथुम निसांका, बाबर आझम, रोहित शर्मा आणि विराट कोहली या धुरंधरांनाही मागे टाकले. निसांका आणि बाबरने प्रत्येकी 11 वेळा ही कामगिरी केली आहे. तसेच, रोहित आणि विराटने प्रत्येकी 10 वेळा अशी कामगिरी केली होती. (Shubman Gill dismissed for 92 against sri lanka)
हेही वाचा-
कोहली ऑन टॉप! विराटने दिला सचिनच्या आणखी एका विश्वविक्रमाला तडा
गिलसाठी 2023 वर्ष ‘शुभ!’ विराट अन् रोहितला पछाडत ‘या’ विक्रमात मिळवला अव्वल क्रमांक, बाबरही मागेच