भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात मोटी धावसंख्या उभी केली. विराट कोहली आणि सलामीवीर शुबमन गिल यांनी संघासाठी शतकीय योगदान दिले आणि संघाची धावसंख्या 390 पर्यंत पोहोचवली. विराटने नाबाद 166, तर शुबमनने 116 धावा केल्या. यादरम्यान दोघांच्या नावावर काही महत्वाच्या वविक्रमांची नोंद झाली. वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिल याचा हा 18 वा सामना होता. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून संघासाठी चमकदार कामगिरी करत आला आहे. कारकिर्दीतील या 18 व्या वनडे सामन्यात गिलने मोठी विक्रम नावावर केला.
शुबमन गिल (Shubman Gill) श्रीलंकेविरुद्धच्या या वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या साधीने डावाची सुरुवात करण्यासाठी आला. रोहितने 49 चेंडूत 42 धावा केल्या आणि विकेट गमावली. पहिल्या विकेटसाठी या रोहित आणि गिल यांच्यात 95 धावांची भागीदारी झाली. रोहितने विकेट गमावल्यानंतर गिने मात्र स्वतःचे शतक साकारले. शतक पूर्ण करण्यासाठी 89 चेंडू खेळले. सामन्यातील 116 धावांच्या जोरावर गिलची वनडे फॉरमॅटमधील एकंदरीत धावसंख्या 894 झाली. कारकिर्दीतील पहिल्या 18 वनडे डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तानचा फकर जमान या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. फकर जमानने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्या 18 डावांमध्ये 1065 धावा केल्या होत्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर इमाम उल हक (Imam Ul Haq) आहे. इंजमामने वनडे कारकिर्दीतील पहिल्या 18 डावांमध्ये 910 धावा केल्या होत्या. गिल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलने पहिल्या 18 वनडे डावांमध्ये 894 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका संघाचा रस्सी वॅन डर ड्यूसने (Van der Dussen) याचे नाव आहे. ड्यूसनने पहिल्या 18 वनडे डावांमध्ये 890 धावा केल्या आहेत. बाबर आझम (Babar Azam) 886 धावांसह यादीत पाचव्या क्रमांकावरील आहे. भारतासाठी पहिल्या 18 वनडे डावांमध्ये गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, तिसऱ्या क्रमांकावर नवजोतसिंग सिद्धू, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली, तर पाचव्या क्रमांकावर शिखर धवन आहे.
पहिल्या 18 वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1065 – फकर जमान
910 – इमाम उल हक
894 – शुबमन गिल
890 – रस्सी वॅन डर ड्यूसेन
886 – बाबर आजम
भारतीय संघासाठी पहिल्या 18 वनडे डावांमध्ये सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज
894 – शुबमन गिल
788 – श्रेयस अय्यर
760 – नवजोतसिंग सिद्धू
759 – विराट कोहली
735 – शिखर धवन
(Shubman Gill has become the highest run-scorer in the first 18 ODI innings while playing for the Indian team)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची वादळी खेळी माहेला जयवर्धनेला पडली महागात, महान फलंदाजांच्या यादीतून झाला पत्ता कट
विराटची बॅट बोलते! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चा मोठा रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर