भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळतोय. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला फॉर्म त्याने काउंटी क्रिकेटमध्ये देखील कायम राखलाय. त्याने ससेक्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या चार दिवसीय प्रथमश्रेणी सामन्यात शानदार शतक झळकावले. त्याचे हे काउंटी क्रिकेटमधील पहिले शतक ठरले.
𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗬!!!
Shubman Gill makes a maiden Glamorgan century 👏👏👏
123 balls, 12 fours, 2 sixes. Well batted, Shubman! 🙌
Glamorgan 245/4
𝗪𝗮𝘁𝗰𝗵 𝗹𝗶𝘃𝗲: https://t.co/7M8MBwgNG2#SUSvGLAM | #GoGlam pic.twitter.com/D7fiC5jYmf
— Glamorgan Cricket 🏏 (@GlamCricket) September 27, 2022
ग्लॅमॉर्गनने दुसऱ्या दिवसाची सुरुवात तीन बाद 221 धावांपासून केली. गिल पहिल्या दिवशी 91 धावा करून नाबाद होता. दुसऱ्या दिवशी गिलने 50 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले शतक पूर्ण केले. इंग्लंडच्या धरतीवरील त्याचे हे पहिले शतक आहे. या शतकादरम्यान गिलने पाकिस्तानचा गोलंदाज फहीम अश्रफ याला चांगलेच निशाण्यावर घेतले. गिलने बाद होण्यापूर्वी 139 चेंडूवर 119 धावा काढल्या.
गिल व्यतिरिक्त संघाचा कर्णधार डेव्हिड लॉइड याने देखील शानदार अर्धशतक झळकावले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा सॅम कुक 80 धावांवर खेळत होता. ग्लॅमॉर्गनने 400 धावांच्या पुढे मजल मारली होती.
गिल मागील काही काळापासून शानदार फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावरील वनडे मालिकांमध्ये तो मालिकावीर ठरला होता. झिम्बाब्वे विरूध्द त्याला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक झळकावण्यात यश आलेले. त्यानंतरच ग्लॅमॉर्गनने त्याच्याशी करार केलेला. गिलने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 92 धावांची खेळी केली होती. पदार्पणात शतक झळकावण्याची कामगिरी मात्र तो करू शकला नव्हता. मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेत तो पुन्हा एकदा भारतासाठी सलामीला दिसू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड ए विरुद्ध संजू सॅमसनची ‘कॅप्टन्स इनिंग’;तिलक, शार्दुलचीही चमकदार फलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज