भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्टपासून खेळवला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलला काही विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी असेल. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने 159 धावा करताच, तो जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025-27 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. या यादीत सध्या इंग्लंडचा फलंदाज जो रूट अग्रस्थानी आहे.
WTC २०२५-२७ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, सध्या जो रूट अव्वल स्थानावर आहे. त्याने 13 सामन्यांच्या 25 डावांमध्ये 48.17 च्या सरासरीने 1108 धावा केल्या आहेत. तर दुसरीकडे शुभमन गिलने या WTC मध्ये आतापर्यंत 8 सामन्यांमध्ये 79.16 च्या सरासरीने 950 धावा केल्या आहेत. जर गिलने श्रीलंकेविरुद्धच्या आगामी पहिल्या कसोटी सामन्यात 159 धावा केल्या, तर तो जो रूटला पछाडून या यादीत पहिल्या क्रमांकावर येईल. परंतु 18 ऑगस्टपासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातही कसोटी सामना सुरू होत आहे, त्यामुळे गिलकडे पहिल्याच डावात मोठे शतक ठोकून जो रूटच्या पुढे जाण्याची उत्तम संधी असेल.
WTC 2025-27 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूटनंतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडच्याच हॅरी ब्रूकचे नाव आहे. त्याने या WTC मध्ये आतापर्यंत 13 सामन्यांत 44 च्या सरासरीने 1056 धावा केल्या आहेत. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गिलचे नाव आहे. इंग्लंडचा बेन डकेट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. उसने 13 सामन्यांत 36.40 च्या सरासरीने 910 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ८ सामन्यांत 853 धावा करून या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलला WTC मध्ये 3000 धावा पूर्ण करण्याचीही संधी असेल. हा टप्पा गाठण्यासाठी गिलला केवळ 157 धावांची गरज आहे. आता दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत गिल हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विशेष म्हणजे या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. तिथे कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ 7 ऑगस्टपासून श्रीलंका XI विरुद्ध एक सराव सामना देखील खेळणार आहे.






