झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही शानदार खेळ दाखवत सामन्यासह मालिका आपल्या नावे केली. युवा फलंदाज शुबमन गिल याने या सामन्यात भारतीय फलंदाजीचे नेतृत्व केले. त्याने अप्रतिम फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. याच खेळीसाठी त्याला सामनावीर व मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांनी गौरवले गेले. आपल्या आक्रमक शतकी खेळी दरम्यान त्याने काही विक्रमांना गवसणी घातली.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधर केएल राहुल व शिखर धवन बाद झाल्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गिलने आयपीएलपासून सुरू असलेला आपला अप्रतिम फॉर्म कायम राखला. आधी त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ईशान किशनसोबत १४० धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने वेगाने शतकाकडे कूच केली. ८२ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने ९७ चेंडूवर १५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १३० धावा केल्या. संपूर्ण मालिकेचा विचार केल्यास त्याने या तीन सामन्यात मिळून एक शतक व एक अर्धशतकाच्या मदतीने २४५ धावा केल्या.
शुबमनला आपल्या केवळ ९ सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्दीत दुसऱ्यांदा मालिकावीर पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही वेळेस तो भारताबाहेर मालिकावीर बनला. यापूर्वी, नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातही त्याला मालिकावीर पुरस्कार मिळालेला. दुसऱ्यांना वनडेत मालिकावीर पुरस्कार पटकावून त्याने मोहम्मद अझरुद्दीन, रवी शास्त्री, रोहित शर्मा व विराट कोहली यांची बरोबरी केली. भारताबाहेर वनडेत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर चार मालिकावीर पुरस्कार तर, सौरव गांगुली व एमएस धोनी हे प्रत्येकी तीन वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाबाबत मोठी बातमी समोर, ‘या’ देशात केलं जाणार आयोजन
रोहितच्या म्हणण्याने नाही, तर ‘या’ तारखेच्या बैठकीत ठरणार टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
उधारीची जर्सी घालणाऱ्या धवनकडे चाहत्याने मागितला शर्ट, गब्बरची रिएक्शन पाहून तुम्हीही म्हणाल…