खेळाडू जेव्हा कधी मैदानात सामना जिंकतो किंवा एकादा मोठा विक्रम करतो, तेव्हा त्याच्या आनंदाला मर्यादा नसते. आनंदात अनेकदा खेळाडू तुफान जल्लोष करतात. दरम्यान, सध्या अशाच एका फलंदाजाची चर्चा होत आहे, ज्याने शतक केल्यानंतर खास जल्लोष केला. या खेळाडूचे नाव सिंकदर रजा असून त्याने झिम्बाब्वेला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला.
बांगलादेश संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून त्यांच्यासाठी हा दौरा अपेक्षेप्रमाणे पार पडला नाहीये. टी-२० मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला झिम्बाब्वेने पराभाची धूळ चारली आहे. एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सिकंदर रजा (Sikandar Raza) याचे प्रदर्शन झिम्बाब्वे संघाच्या विजायासाठी महत्वाचे ठरले. त्याने या सामन्यात १२७ चेंडूत ११७ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक होते.
या शतकाच्या जोरावर त्याने झिम्बाब्वेला फक्त दुसरा सामनाच जिंकवून दिला नाही, तर मालिका देखील नावावर करून दिली. झिम्बाब्वेला या सामन्यात २९१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. सिंकदरने या सामन्यात शतक केले आणि संघाला ४७.३ षटकात विजय मिळवून दिला. लक्ष्य गाठण्यासाठी झिम्बाब्वेच्या ५ फलंदाजांनी विकेट्स गमावल्या. शतक केल्यानंतर सिकंदरने ज्या पद्धतीने जल्लोष केला, त्याची चर्चा होत आहे.
शतक पूर्ण झाल्यानंतर सिकंदर बॅट झातीवर मारताना दिसला. त्याने असे एकदा नाही, तर तीन वेळा केले. व्हिडिओत २.४० मिनिटांनंतर पाहिले जाऊ शकते की, सिकंदर हातातील बॅट हळूवार छातीवर मारत आहे. क्रिकेपटविश्वात अनेक दिग्गजांना यापूर्वी अशाच पद्धतीने जल्लोष करताना पाहिले गेले आहे. फॅनकोडने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
.@SRazaB24's shot-making was a treat to watch as he scored an unbeaten 117 to take Zimbabwe to victory against Bangladesh.
Watch all the action from the Bangladesh tour of Zimbabwe LIVE, exclusively on #FanCode 👉 https://t.co/CHsPGFv1Q0@ZimCricketv @BCBtigers#ZIMvBAN pic.twitter.com/MVHRMnSChz
— FanCode (@FanCode) August 8, 2022
दरम्यान, बांगलादेशच्या या झिम्बाब्वे दौऱ्याचा विचार केला, तर त्यांचे प्रदर्शन खूपच निराशाजनर राहिले. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत बांगलादेश संघाला २-१ असा पराभव मिळाला. तसेच उभय संघातील एकदिवसीय मालिका देखील झिम्बाब्वेने सहजासहजी नावावर केली. मालिकेतील पहिले दोन्ही एकदिवसीय सामने बांगलादेशने गमावले. आता तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान जे विचार करतोय, भारत ते करून दाखवेल! आशिया चषकातील घमासानापूर्वी आली प्रतिक्रिया
आशिया कप जिंकण्यात टीम इंडिया शेर, मात्र वैयक्तिक कामगिरीत ‘या’ देशाचे खेळाडू सव्वाशेर
रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर