यंदाचा आयपीएल हंगाम मध्यातच रद्द करावा लागल्याने क्रिकेट चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. दर्जेदार क्रिकेट सामने पाहण्याची त्यांची इच्छा हिरावून घेतल्यासारखे झाले होते. मात्र इंग्लंड मधील कौंटी सामान्यांनी ही कसर भरून काढली आहे. सध्या चालू असलेल्या कौंटी सामान्यांनी दर्जेदार क्रिकेटचा आनंद चाहत्यांना मिळतो आहे.
दररोज या कौंटी सामन्यात घडणार्या घडामोडी लक्ष वेधून घेत आहेत. असाच एक प्रसंग एसेक्स विरूद्ध डर्बीशायर संघाच्या सामन्यात घडला. या सामन्यात फिरकीपटू सिमोन हार्मरने एकाच डावात चक्क ९ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
हार्मरची भेदक गोलंदाजी
दक्षिण आफ्रिकेचा ऑफस्पिनर सिमोन हार्मर कौंटी क्रिकेटमध्ये एसेक्सच्या संघाकडून खेळतो. या संघाकडून डर्बीशायर संघाविरुद्धचा सामना खेळतांना त्याने इतिहास रचला. या सामन्यात त्याने एकाच डावात ९ विकेट्स घेतल्या. २५.५ षटकांत त्याने ८० धावा देऊन या ९ विकेट्स पटकावल्या. हार्मरच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. डर्बीशायरच्या संघाची उर्वरित एक विकेट डॅन लॉरेन्सने घेतली.
What. A. Catch. Simon Harmer, you're magic! ✨
He finished with career-best first-class figures of 9/80, as Essex toppled Derbyshire for 146!
You can watch live as Sir Alastair Cook returns to the crease here ➡️ https://t.co/cMi9FPCcrH#LVCountyChamp pic.twitter.com/GZ12ibehRk
— Rothesay County Championship (@CountyChamp) May 15, 2021
या सामन्यात पहिल्या डावात एसेक्सच्या संघाने ३ विकेट्स गमावून ४१२ धावा केल्या होत्या. मात्र या प्रत्युत्तरात खेळायला उतरलेल्या डर्बीशायर संघाची हार्मरच्या फिरकी समोर दाणादाण उडाली. त्यांचा संघ अवघ्या १४६ धावांत सर्वबाद झाला. फॉलोऑन मिळाल्यानंतर डर्बीशायरने १ विकेट गमावून ९७ धावा केल्या आहेत.
सिमोन हार्मरची कारकीर्द –
कौंटी क्रिकेट व्यतिरिक्त सिमोन हार्मरने दक्षिण आफ्रिकेसाठी ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने २० विकेट्स पटकावल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आत्तापर्यंत १५६ सामने खेळले असून त्यात ६६८ विकेट्स घेण्याची किमया केली आहे. डर्बीशायर विरूद्धच्या सामन्यात एका डावात ८० धावांत घेतलेल्या ९ विकेट्स ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नाचा रे! शुबमन गिल अन् कमलेश नागरकोटीसह थिरकले राणा दाम्पत्य, एकदा पाहाच हा डान्स व्हिडिओ
कोहलीवर टीका करणार्या वॉनला पाकिस्तानी खेळाडूची चपराक, म्हणाला “एकही वनडे शतक मारू न शकणार्यांनी…”
आयपीएल २०२१: मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने मोडले सारे उच्चांक, वाचा सविस्तर