भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान मेलबर्न येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय संघाने सामन्यात 131 धावांची आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय संघ मोठी आघाडी मिळवेल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र रविंद्र जडेजाचा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला व त्यामुळे कर्णधार अजिंक्य 112 धावांवर धावबाद झाला.
अजिंक्य बाद झाल्यानंतर अनेक क्रिकेट रसिकांनी त्याच्या आणि टीम पेनच्या पहिल्या डावातील धावबादच्या अपीलमधील साम्य पुढे आणले. टीम पेनला पहिल्या डावात धावबाद देण्यात नकार देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
या सर्व चर्चेदरम्यान ‘ 7 क्रिकेट ‘या चॅनलने क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अंपयार पैकी एक मानले जाणारे निवृत्त अंपायर सायमन टॉफेल यांना चर्चेला बोलावले. यावेळी टॉफेल यांनी दोन्ही निर्णयामधील तांत्रिक कारण स्पष्ट केले आहे.
टॉफेल यांनी सांगितले की अजिंक्यच्या धावबादमध्ये कॅमेरा अँगलमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की बेल्स या स्टम्पपासून पूर्णतः दूर झाल्या आहेत. व त्याच वेळी बॅट रेषेवरच आहे. त्यामुळे येथे आउट देण्याचा निर्णय योग्य आहे. पहिल्या डावात पेनच्या बाबतीत निर्णय देताना हे स्पष्ट होत नव्हते की बेल्स पूर्णपणे स्टम्प पासून दूर झाल्या आहेत अथवा नाही. त्यावेळी कोणताच कॅमेरा अँगल कोणतेही ठोस पुरावा देवू शकत नव्हता. त्यामुळे तेथे नाबाद दिलेला निर्णय देखील योग्य आहे.
"The third umpire has got a shot here of the separation point and the bat on the line."
Simon Taufel explains the difference between Paine being not out on Day 1 and Rahane being out today #AUSvIND pic.twitter.com/b8UBQBDLDk
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2020
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरु असलेला दुसरा सामना अतिशय रोमांचक स्थितीत आलेला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 131 धावांची आघाडी मिळवली आहे. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 50 षटकांच्या आतच 6 विकेट्स गमावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: अवघ्या काही इंचांनी हुकली रहाणेची धाव, पाहा कसा झाला रनआऊट
टीम इंडियाच्या अडचणीत भर! गोलंदाजी करताना उमेश यादव ‘असा’ झाला दुखापतग्रस्त, पाहा व्हिडिओ
ब्रकिंग! वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, स्कॅनसाठी मैदानातून बाहेर