नंदुरबार हिमालयन ताहर्स विरुद्ध पालघर काझीरंगा रहिनोस यांच्यात रेलीगेशन फेरीतील शेवटची लढत झाली. पालघर संघ प्ले-ऑफस साठी पात्र झाला होता तर नंदुरबार संघाचे आव्हान संपुष्टात आल्याने त्यांच्यासाठी हा सामना औपचारिकता होती. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली.
पहिल्या 10 मिनिटाला 11-8 अशी आघाडी पालघर संघाकडे होती. ओम पाटीलच्या आक्रमक चढाया व हर्ष व सर्वेश यांचा उत्कृष्ट बचावाच्या जोरावर पालघर संघाने नंदुरबार संघाला ऑल आऊट केले. मध्यांतरला पालघर संघाकडे 22-17 अशी आघाडी होती. पियुष पाटील ने 8 गुण मिळवत महत्वपूर्ण भूमिका निभावली.
पालघर काझीरंगा रहिनोस संपूर्ण सामन्यात 4 वेळा ऑल आऊट करत सामना एकतर्फी केला. पालघर संघाने 50-31 आता विजय मिळवला. पालघर कडून पियुष पाटील ने 17 गुण मिळवले तर ओम पाटील ने 10 गुण मिळवले. पकडीत हर्ष मेहेर ने हाय फाय केला. नंदुरबार कडून अभिजित गायकवाड ने 9 गुण तर अतुल राठोड ने 5 पकडी केल्या. (Sixth win for Palghar Kaziranga Rhinos in relegation)
बेस्ट रेडर- पियुष पाटील, पालघर काझीरंगा रहिनोस
बेस्ट डिफेंडर्स- हर्ष मेहेर, पालघर काझीरंगा रहिनोस
कबड्डी का कमाल- सुशांत शिंदे, नंदुरबार हिमालयन ताहर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सांगली सिंध सोनिक्स संघाची विजयासह सांगता
रेलीगेशन फेरीत रायगड मराठा मार्वेल्स संघ अव्वल