डकवर्थ लुईस नियमामुळे गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उभारलेले 214 धावांचे आव्हान एका झटक्यात 171 धावांवर आले. हे आव्हान पार करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या हातात फक्त 15 षटके होती. मात्र, चेन्नईच्या डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांनी बॅटमधून आग ओकत चांगली सुरुवात करून दिली आणि शेवटी जडेजाने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारत चेन्नईला 5 विकेट्सने सामना जिंकून दिला. तसेच, चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवले. या विजयानंतर चेन्नईचे खेळाडू खूपच खुश दिसत होते. अशात, महेंद्र सिंग धोनी आणि दीपक चाहर यांचाही मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वाहवा लुटत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दीपक चाहर आणि एमएस धोनी (Deepak Chahar And MS Dhoni) दिसत आहेत. एका चाहत्याप्रमाणे दीपक चाहर (Deepak Chahar) याने धोनीकडे ऑटोग्राफ मागितला, पण एमएस धोनीने दीपक चाहर याला ऑटोग्राफ देण्यास नकार दिला. एमएस धोनी (MS Dhoni) याने यावेळी नाराजीही व्यक्त केली, पण तो पूर्णत: मजा-मस्तीच्या मूडमध्ये दिसत होता. यावेळी धोनी चाहरने सामन्यात झेल सोडण्याविषयी मजेशीर अंदाजात त्याला रागावताना दिसला.
Deepak Chahar came for autograph and MS Dhoni reaction ????????pic.twitter.com/n0xMu2KlOq
— ???? (@StanMSD) May 29, 2023
मात्र, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) तिथे येतात. यावेळी तेदेखील धोनी आणि चाहरच्या मजा-मस्तीचा आनंद लुटतात. यावेळी चाहर कसाबसा जर्सीवर धोनीचा ऑटोग्राफ (Dhoni Autograph) घेण्यात यशस्वी होतो. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वत्र सतत पाहिला जात आहे.
தோனி – கேட்ச்சே புடிக்க மாட்ரான் இந்த லவடா… சைன் வேனும்னு வர்ரான் ???????? pic.twitter.com/G44ZFnQ5Oe
— ℳsd Kutty (@its_MsdKutty) May 29, 2023
खरं तर, या सामन्यात गुजरात टायटन्सच्या डावादरम्यान दीपक चाहर याने शुबमन गिल याचा महत्त्वाच्या वेळी सोपा झेल सोडला होता. त्याचबाबत धोनी सामन्यानंतर त्याला समजावताना दिसला.
अंतिम सामन्यात चालली नाही चाहरची गोलंदाजीची जादू
अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांकडून खास प्रदर्शन पाहायला मिळाले नाही. दीपक चाहर याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा खर्च करून 1 विकेट नावावर केली. चाहरच्या हंगामातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 10 सामन्यात 22.84च्या सरासरीने एकूण 13 विकेट्स घेतल्या. चेन्नईसाठी या हंगामात तुषार देशपांडे याने सर्वाधिक 21 आणि रवींद्र जडेजाने 20 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, देशपांडेने सर्वाधिक 564 धावाही खर्च केल्या. (skipper ms dhoni reaction when deepak chahar came for autograph after winning ipl 2023 final csk vs gt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ
आयपीएलमध्ये पूर्वी सचिन आणि विराट ज्या सदम्यातून गेले, तो यावर्षी शुबमन गिलला बसला