आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल. आता भारताला 22 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करायचे आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडिअममध्ये ऑस्ट्रेलिया संघाने सराव सत्रात घाम गाळला. सरावासाठी दुपारी 1 वाजेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघ स्टेडिअममध्ये पोहोचला होता. अशात ऑस्ट्रेलिया संघाविषयी मोठी बातमी समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने माध्यमांशी बोलताना आगामी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी ही मालिका तयारीसाठी महत्त्वाची असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, “भारतासारख्या मजबूत संघासोबत 3 सामन्यांची मालिका खेळून आम्ही मोठ्या स्पर्धेपूर्वी लयीत येण्याचा प्रयत्न करू.” याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज याच्याविषयी विचारले असता, कमिन्स म्हणाला की, “आम्ही सिराजसाठी कोणतीही योजना बनवली नाहीये.”
‘हे’ 2 खेळाडू मुकणार
कमिन्सने यावेळी संघातील 2 खेळाडू पहिल्या सामन्यासाठी मुकणार असल्याचेही स्पष्ट केले. तो म्हणाला, “मोहालीत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क दुखापतग्रस्त असल्यामुळे सामन्यात खेळू शकणार नाहीत. तसेच, स्टीव्ह स्मिथच्या मनगटात वेदना होतायेत. त्याने बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) सराव सत्रात फलंदाजी केली होती. सर्वकाही ठीक राहिले, तर तो उद्या फलंदाजी करू शकतो.”
Mitchell Starc ruled out of the first ODI against India. pic.twitter.com/kWne9k8ACU
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2023
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍलेक्स कॅरे, नेथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवूड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नस लॅब्यूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर आणि ऍडम झम्पा.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव
अलीकडेच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात उभय संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-3ने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. (skipper pat cummins said glenn maxwell and mitchell starc will not feature in first odi india vs australia)
हेही वाचाच-
लेक चालली सासरी! आफ्रिदी झाला भावूक, जावई अन् मुलीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला…
दक्षिण आफ्रिकेला 880 व्होल्टचा झटका! World Cup 2023मधून ‘हे’ 2 घातक वेगवान गोलंदाज बाहेर, लगेच वाचा