इंदोरचं होळकर क्रिकेट स्टेडिअम भारतीय संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या कामिगरीने दुमदुमून टाकले. या मैदानावर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने पाहुण्या न्यूझीलंड संघाला 90 धावांनी धूळ चारली. भारताच्या विजयात रोहित शर्मा, शुबमन गिल यांनी फलंदाजीतून, तर शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी गोलंदाजीतून मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे, या विजयानंतर भारतीय संघाने 3 सामन्यांची वनडे मालिका 3-0ने खिशात घातली. या विजयातील कामगिरीसाठी शार्दुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सामन्यानंतर कर्णधार रोहितने शार्दुलचे कौतुक केले. यावेळी तो असे काही म्हणाला, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर काय म्हटले?
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारतीय गोलंदाजांचं कौतुक केलं. तो म्हणाला की, “हा खूपच शानदार सामना राहिला. भारताने तिन्ही विभागात दमदार कामगिरी केली. मागील 6 सामन्यात संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली, ती प्रशंसनीय आहे. आज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांच्या जागी राखीव खेळाडूंना आजमवायचे होते. चहल आणि उमरानवर आम्ही विश्वास दाखवला आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. आम्ही चांगली गोलंदाजी केली आणि योजनेवर टिकून राहिलो.”
शार्दुल ठाकूरला म्हटले ‘जादूगार’
पुढे बोलताना रोहित शर्माने शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याला ‘जादूगार’ म्हटले. तो म्हणाला की, “डेवॉन आणि निकोलस जेव्हा क्रीझवर होते, तेव्हा आम्हाला दबाव जाणवत होता. मात्र, नंतर शार्दुलने येऊन काम सोपे केले. शार्दुल काही काळापासून शानदार कामगिरी करत आहे. संघातील काहीजण त्याला ‘जादूगार’ म्हणतात. मी जेव्हाही कुलदीप यादव याच्याकडे चेंडू सोपवला आहे, तेव्हा त्याने विकेट काढली आहे.”
https://twitter.com/BCCI/status/1617923172506177536
शार्दुल ठाकूरची सामन्यातील कामगिरी
भारतीय संघाकडून तिसऱ्या वनडेत शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शार्दुलने 6 षटके गोलंदाजी करताना 45 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच, कुलदीपनेही 9 षटके गोलंदाजी करताना 62 धावा देत 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्यांच्याव्यतिरिक्त युझवेंद्र चहल याने 2 विकेट्स घेतल्या, तर हार्दिक पंड्या आणि उमरान मलिक यांना प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. (skipper rohit sharma on shardul thakur after india win odi series against new zealand 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भोपळाही न फोडणाऱ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर; म्हणाला, ‘त्यांनी…’
टीम इंडियाच्या माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा! अडीच वर्षांचा असतानाच वडिलांच्या लक्षात आलेले कौशल्य