श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघातील पहिला कसोटी सामना गाले आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, गाले येथे गुरुवारी (दि. 20 जुलै) पार पडला. हा सामना पाकिस्तानने 4 विकेट्सने आपल्या खिशात घातला. आपल्याच मायदेशात पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने निराश झाला. मायदेशातील पराभवाला त्याने आपल्याच फलंदाजांना जबाबदार धरले. त्याने यावेळी स्पष्ट म्हटले की, वरच्या फळीतील फलंदाजांना जास्त योगदान द्यायला पाहिजे होते.
फलंदाजांवर कडाडला करुणारत्ने
पाकिस्तान संघाकडून 4 विकेट्सने पराभूत झाल्यानंतर दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याने मोठे विधान केले. तो म्हणाला की, “आम्ही जेव्हा नाणेफेक जिंकली, तेव्हा आम्हाला माहिती होते की, त्यांचे वेगवान गोलंदाज कसे आहेत. आम्ही सुरुवातीचे विकेट्स गमावले. वरच्या फळीतील फलंदाजांच्या रूपात आम्ही आणखी योगदान दिले पाहिजे होते. तसेच, जबाबदारी घ्यायला पाहिजे होती.”
Pakistan won the first test by 4 wickets and take 1-0 lead in the 2-match series. 🏏#SLvPAK pic.twitter.com/i9dERYkhMj
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 20, 2023
गोलंदाज आणि डी सिल्वाचे कौतुक
करुणारत्ने याने गोलंदाजी विभागाचे कौतुक केले. तो म्हणाला की, “आम्ही वास्तवात चांगली गोलंदाजी केली. कधी-कधी आम्ही धावा खर्च केल्या. एक संघ म्हणून आम्हाला त्या क्षेत्राबाबत विचार करावा लागेल, ज्यात आम्हाला सुधारणा करायची आहे आणि अधिक मेहनत घ्यायची आहे. धनंजय डी सिल्वा जबाबदारी घेतो आणि नेहमी तेच करतो, ज्याची संघाला गरज असते. इतर खेळाडूंना पुढे येऊन चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे.”
सामन्याची स्थिती
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर श्रीलंकाने पहिल्या डावात 312 धावा केल्या होत्या. सलामीवीर फलंदाज निशान मदुष्का 4, तर स्वत: कर्णधार करुणारत्ने 29 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कुसल मेंडिस 12 धावा करून बाद झाला होता. पहिल्या डावात 312 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने सौद शकील याच्या द्विशतकाच्या जोरावर 461 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका संघाचा दुसरा डाव 279 धावांवर संपुष्टात आला. अशात पाकिस्तानला या सामन्यात 131 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान त्यांनी दुसऱ्या डावात 6 विकेट्स गमावत पूर्ण केले. (sl vs pak 1st test skipper dimuth karunaratne reacts to sri lankas defeat)
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुख बनला विश्वचषकाचा ब्रँड एंबॅसेडर! व्हायरल फोटोनंतर आयसीसीने शेअर केला खास व्हिडिओ
हर्षित राणाचा अविश्वसनीय कॅच पाहून 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान! पाकिस्तानी फलंदाज अर्धशतकाविना तंबूत