आयसीसी वनडे विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. शनिवारी (7 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांत्यातील रोमांचक लढत चाहत्यांना पाहायला मिळाली. मोठी धावसंख्या केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हा सामना 102 धावांनी जिंकला. पण शामना वेळेत न संपल्यामुळे आयसीसीकडून श्रीलंकन संघावर कारवाई केली गेली आहे.
षटकांची गती राखता न आल्यामुळे आयसीसीने श्रीलंकन संघाच्या सामना शुल्काच्या 10 टक्के रक्कम कापली आहे. भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) या सामन्यासाठी मॅच रेफरीची भूमिका पार पाडत होते. श्रीलंकन संघ ठराविक वेळेच्या आतमध्ये 50 षटके टाकू शकला नाही. त्यांनी दोन षटकांसाठी लागणारा वेळ अधिक घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई आयसीसीकडून केली गेली आहे.
आयसीसीचे कलम 2.22 नुसार षटकांची गती न राखणाऱ्या संघाशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या शुल्कामधून ही रक्कम कापली जाते. एका षटकासाठी 5 टक्के रक्कम या हिशोबाने आयसीसीने श्रीलंकन संघावर 10 टक्के सामना शुक्ल कापण्याची कारवाई केली आहे. श्रीलंकन संघाचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) यानेही हे सर्व आरोप स्वीकारले आहेत, ज्यामुळे कुठल्याी औपचारिक सुनावणीची गरज नाही, असे सांगितले गेले आहे.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर श्रीलंकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकने 50 षटकात 5 बात 428 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ 44.5 षटकांमध्ये 326 धावा करून सर्वबाद झाला. (SL vs SA, ICC action against Sri Lanka team due to slow over rate)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकप कमबॅकमध्ये अश्विन आण्णाचा जलवा! होम ग्राउंडवर केली कमाल
ऑस्ट्रेलियाचा ‘सिंह’ खेळणार वर्ल्डकप? थेट चार वर्षानंतर उतरणार मैदानात