Smriti Mandhana T20I Record: स्मृती मंधाना हीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3 हजार धावांचा टप्पा पार करणारी मंधाना एकूण सहावी आणि भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात 3 हजार धावांचा टप्पा पार केला. मंधनापूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने महिला क्रिकेटमध्ये हा आकडा पार केला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना, स्मृती मंधाना हीने 52 चेंडूत 54 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये तिने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तिने भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (smriti mandhana become second indian women batter to cross 3000 t20i runs and over all 6th)
डीवाय पाटील स्पोर्ट्स मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.2 षटकात सर्वबाद 141 धावांवर आटोपला. फोबी लिचफिल्ड हीने संघासाठी 49 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 17.4 षटकांत हे लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. भारताकडून शेफाली वर्मा हीने 44 चेंडूत 6 चौकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 64 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय स्मृती मंधानाने 52 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 54 धावांची खेळी केली.
मंधानाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत 126 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 122 डावांमध्ये फलंदाजी करताना तिने 27.49 च्या सरासरीने आणि 122.08 च्या स्ट्राईक रेटने 3052 धावा केल्या आहेत. या काळात तिच्या बॅटमधून 23 अर्धशतके निघाली आहेत. या भारतीय महिला फलंदाजाने 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपैकी मंधाना एक आहे. (INDW vs AUSW Smriti Mandhana creates history becomes second Indian to do such feat in T20)
हेही वाचा
Cricketer of the Year: ICCकडून 2023 ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’ खेळाडूंची यादी जाहीर, भारताच्या ‘या’ दोन खेळाडूंच्या नावांचा समावेश
INDW vs AUSW । डी वाय पाटीलवर स्मृती-शेफालीचा धमाका, पहिल्या टी-20 ऑस्ट्रेलियालाविरुद्ध तितास साधू ठरली मॅचविनर