सध्या बांगलादेश येथे महिला आशिया चषक खेळला जात आहे. टी20 प्रकारातील या आशिया चषकात भारतीय संघाचा अखेरचा साखळी सामना थायलंडविरुद्ध झाला. भारतीय संघाने या सामन्यात नऊ गड्यांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या सामन्यात नेतृत्व करणारी अनुभवी सलामीवीर स्मृती मंधाना हिने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
सिल्हेट येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उपकर्णधार स्मृती मंधाना संघाचे नेतृत्व करत होती. नाणेफेकीसाठी मैदानावर उतरताच तिने एक खास विक्रम आपल्या नावे नोंदविला. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने पूर्ण करणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू बनली. भारतातर्फे अशी कामगिरी सर्वात पहिल्यांदा हरमनप्रीत कौर हिनेच केली होती. तिने आत्तापर्यंत 135 टी20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
All set to play her 1⃣0⃣0⃣th T20I 👏👏
Go well, @mandhana_smriti #TeamIndia | #INDvTHAI | #AsiaCup2022 pic.twitter.com/oqqCjmk7bs
— BCCI Women (@BCCIWomen) October 10, 2022
स्मृतीने आतापर्यंत खेळलेल्या 100 सामन्यांमध्ये 26.96 च्या सरासरीने 2373 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 अर्धशतकांचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणारी स्मृती वुमन्स टी20 चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व करते. या संघाला तिने 2020 मध्ये विजेतेपद देखील पटकावून दिले होते. या व्यतिरिक्त ती इतर देशांमध्ये लीग क्रिकेट देखील खेळते.
आपल्या 100 व्या सामन्यात तिला फलंदाजीची संधी मात्र मिळाली नाही. भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत थायलंडचा डाव अवघ्या 37 धावांवर संपुष्टात आणला होता. त्यानंतर भारताने अवघा एक गडी गमावत हे लक्ष पार केले. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंका संघाशी होण्याची दाट शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हिला डाला ना! मैदान तर गाजवलंच, आता ‘माही भाईं’चा डोळा फिल्म इंडस्ट्रीवर; सुरू केलं प्रोडक्शन हाऊस
मूर्ती लहान, कीर्ती महान! इशानने 24 वर्षांच्या वयात केला ‘हा’ पराक्रम, ‘माही भाई’ टेबल टॉपर