भारतीय टी२० महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘द हंड्रेड’ क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली आहे. या दोघीही भारतात माघारी परतणार आहेत.
स्मृती मंधानाने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी स्पर्धेतून माघार घेतली असून कर्णधार हरमनप्रीतने दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. स्मृती द हंड्रेडमध्ये साऊथर्न ब्रेव्ह या संघाकडून खेळते. तर, हरमनप्रीत मँचेस्टर ओरिजनल संघाकडून खेळते. स्मृती मंधानाच्या जागेवर आयरलॅंडची गॅबी लुईसला संघात सामील केले गेले जाणार आहे.
मंधाना म्हणाली, जर मी थांबू शकत असते तर संघासोबत अंतिम सामन्यापर्यंत थांबायची इच्छा होती, पण खूप वेळेपासून घरापासून लांब राहते आहे. येणाऱ्या काळात आम्हाला काही विदेश दौरे करायचे आहेत. मी माझ्या या संघाची लाॅर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणारा सामना पाहिल. आशा करते की हा संघ आपला चांगला खेळ असाच सुरू ठेवतील. या अप्रतिम क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊन मला चांगले वाटले आणि खूप मजा आली.
द हंड्रेडच्या तिच्या शेवटच्या सामन्यात मंधानाने 52 चेंडूत 78 धावांची अप्रतीम खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. या संपूर्ण स्पर्धेत मंधानाने 133 च्या स्ट्राइक रेटने 167 धावा केल्या, तर हरमनप्रीतने एकूण 104 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि ट्रेनर बदलणार, बायो-बबलमध्ये झाले नाहीत सहभागी
हमीद आला अन् गेला!! पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने ‘अशी’ काढली विकेट, पाहा व्हिडिओ
आहा कडक!! लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंसाठी लंचच्या वेळी होते ‘हे’ खास मेन्यू