पुणे। ई2डी स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित एन्ड्युरन्स प्रिमिअर कॉर्पोरेट लीग क्रिकेट 2019 स्पर्धेत सॉफ्टहार्ड ऑटोमेशन, रिग्रीन इंटरप्राईज व हनिवेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
ई2डी क्रिकेट मैदान, लवळे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत अमित कदमच्या अष्टपैलू कामगिराच्या जोरावर सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 20 षटकात 8 बाद 109 धावा केल्या. यात अमित कदमने 29, विराज काकडेने 23तर ओमकार पाटीलने नाबाद 16 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.
त्यानंतर सॉफ्टहार्ड ऑटोमेशने 109 धावांच्या आव्हानाचे रक्षण करताना अमित कदम, सिध्देश वारघंटे व विराज काकडे यांच्या अचूक गोलंदाजीने बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड संघाला 19.5 षटकात सर्वबाद 106 धावांत रोखले. अमित कदम सामनावीर ठरला.
अन्य लढतीत प्रमोद बारवकरच्या नाबाद 43 धावांसह हनिवेल संघाने फोर्झा लॉजीस्टीक्स टेकलॅब संघाचा 6 गडी राखून तर रिग्रीन इंटरप्राईज संघाने ईक्यु टेक्नोलॅजी संघाचा 7 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपुर्व फेरी
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन: 20 षटकात 8 बाद 109 धावा(अमित कदम 29(30), विराज काकडे 23(33), ओमकार पाटील नाबाद 16(14), मोहम्मद लोखंडे 2-16, हुसेन निमुचवाला 2-17) वि.वि बुर्हानी प्रायव्हेट लिमिटेड- 19.5 षटकात सर्वबाद 106 धावा(हुझेफा पुनावाला नाबाद 20(26), सुरज गोंड 19(11), अमित कदम 2-9, सिध्देश वारघंटे 2-24, विराज काकडे 2-31) सामनावीर- अमित कदम
सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाने 3 धावांनी सामना जिंकला.
ईक्यु टेक्नोलॅजी- 14.4 षटकात सर्वबाद 90 धावा(रोदन पाटील 28(25), शैलेंद्र कसबे 4-26, स्वप्निल उगिले 2-7, शरद शिंदे 2-18) पराभूत वि रिग्रीन इंटरप्राईज- 12.1 षटकात 3 बाद 94 धावा(राहुल लोहार नाबाद 44(34), ऋषिकेश कुमावत नाबाद 22(17), निनाद कुलकर्णी 12(11), अमर गजभिये 2-18) सामनावीर- शैलेंद्र कसबे
रिग्रीन इंटरप्राईज संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
फोर्झा लॉजीस्टीक्स टेकलॅब- 20 षटकात 9 बाद 138 धावा(सचिन पाटील 31(22), राकेश गोदरा 16(14), अमीर सिंग 14(22), सिध्दार्थ अगरवाल 14(9), मोहम्मद अहमद 3-15, प्रमोद बारवकर 2-31 ) पराभूत वि हनिवेल- 15.4 षटकात 4 बाद 142 धावा(प्रमोद बारवकर नाबाद 43(37), सुशान मुधलेर 31(13), समिर सातपुते नाबाद 28(18), मयुर कुंभार 15(12), सिध्दार्थ अगरवाल 1-25, हरविंदर सिंग 1-17, मंगेश चंद्रात्रे 1-17) सामनावीर- प्रमोद बारवकर
हनिवेल संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.