मुंबई । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिल्या वनडेत भारतीय संघाला शिखर धवनच्या रूपाने पहिला मोठा झटका बसला आहे. शिखर धवन १२ चेंडूत ९ धावा काढून परतला.
ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर तो यष्टीरक्षक लॅथमकडे झेल देऊन परतला. त्याने ९ धावांच्या खेळीत १ चौकार मारला. शिखर धवन श्रीलंका दौऱ्यांनंतर प्रथमच वनडेत खेळत होता.
शिखर धवन बाद झाल्यावर २०० वा वनडे सामना खेळत असलेला कर्णधार विराट कोहली मैदानावर आला आहे.
सध्या भारतीय संघाच्या ५ षटकांत १ बाद २९ धावा झाल्या आहेत.
तत्पूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने न्यूजीलँड विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांना वगळण्यात आले असून बाकी संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातीलच आहे.
कौटुंबिक कारणामुळे संघाबाहेर असलेला सलामीवीर शिखर धवन पुन्हा आल्यामुळे रहाणेला वगळण्यात आले आहे तर मनीष पांडेच्या जागी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ: शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह.