---Advertisement---

कोरोना काळात सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून आला सोनू सूद; केली ‘ही’ मोठी मदत

On: शुक्रवार, मे 7, 2021 2:09 AM
---Advertisement---

कोरोना वायरसच्या संकटात संपूर्ण देशाला देवदूताप्रमाने मदत करणारा अभिनेता सोनू सूद गुरुवारी(६ मे) भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या मदतीसाठी देखील धावून आला. रैनाने सोशल मीडियात आपल्या आजारी काकूसाठी मदत मागितली होती, त्यावर सोनूने तातडीने मदतीबद्दल माहिती दिली.

सुरेश रैनाने त्याची काकू कोरोनामुळे त्रस्त असल्याचे ट्विट केले होते. रैनाने ट्वीट करुन मदतीची विनंती केली होती. कदाचित रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध नसल्याने रैनाने ऑक्सिजन सिलिंडरची मदत मागितली होती.

आपल्या ट्विटमध्ये रैनाने लिहिले की मेरठमधील त्याच्या काकूला ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. त्यांचे वय 65 वर्ष आहे आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांना फुप्फुसांचा गंभीर आजार झाला आहे. ऑक्सिजनच्या सपोर्ट शिवाय त्यांची ऑक्सिजन पातळी 70 आहे आणि ऑक्सिजन सपोर्ट दिल्यास ऑक्सिजन पातळी 91 आहे. रैनाने आपल्या ट्विटमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील टॅग केले होते.

https://twitter.com/ImRaina/status/1390237702231007236

रैनाच्या या ट्विटनंतर थोड्याच वेळात अभिनेता सोनू सूदने रैनाच्या काकूला मदत करण्यासाठी सिलिंडरची व्यवस्था केली. तसेच सोनूने ट्विटरवर रैनाला सांगितले की दहा मिनिटांत ऑक्सिजन सिलिंडर पोहोचणार आहे. थोड्याच वेळात रैनानेही सोनूला त्याच्या मदतीबद्दल धन्यवाद दिले. सोनूला उत्तर देताना रैनाने लिहिले, ”सोनू पाजी या मदतीबद्दल तुमचे आभारी आहे. तुम्ही खूप मदत केली, धन्यवाद.”

https://twitter.com/SonuSood/status/1390258560177631235

https://twitter.com/ImRaina/status/1390272956773781504

सुरेश रैना हा आयपीएल 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा सदस्य होता. खेळाडूंना होत असलेल्या कोरोनामुळे मंगळवारी(४ मे) आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, सोनू सूद हा कोरोना काळात लोकांना खूप मदत करत आहे. कोरोनामुळे पीडित असलेल्या लोकांसाठी तो औषधे, ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करत असतो. तसेच गरजूंना आपल्या स्वगृही परतण्यासाठी देखील सोनूने फार मदत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शिखर धवनने घेतली कोरोनाची लस; फोटो शेअर करत म्हणाला…

पुन्हा भेटू, काळजी घ्या! भारताचा निरोप घेताना हळहळली दिग्गजांची मनं; एकाने तर मागितली माफी

बुमराहने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त लिहिला प्रेमळ संदेश; पण निशामने केली ‘अशी’ कमेंट की तुम्हालाही येईल हसू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---