---Advertisement---

‘त्यावेळी गांगुली म्हणालेला सचिनला बाद केलस, आता हे लोक तुला मारतील’, शोएब अख्तरचा खुलासा

Shoaib-Akhtar
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकर आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यातील मैदानातील संघर्ष जगजाहीर आहे. अख्तरने क्रिकेट कारकिर्दीत ९ वेळा सचिन तेंडूलकरला बाद केले आहे. शोएबने सचिनला कसोटीमध्ये ३ वेळा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ वेळा बाद केले  आहे. तसेच त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामात २००८ मध्ये सचिनला बाद केले होते. आता याबाबत त्याने एका किस्स्याचा खुलासा केला आहे.

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याबाबत बोलताना म्हणाला की, तो २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. या दरम्यान मुंबई इंडियन्स आणि केकेआर संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमने-सामने आले होते. मुंबईचा कर्णधार सचिन, तर केकेआरचे नेतृत्व सौरव गांगुली होता. या सामन्यादरम्यान केकेआर संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना ६७ धावांवर सर्वबाद झाला. मुंबईने केकेआरला ८ विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यात सचिन शून्यावर बाद झाला होता.

अख्तर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, ‘आमच्या संघाने खुप कमी धावसंख्या बनवली होती. जेव्हा सामना सुरू झाला, तेव्हा मैदानातील वातावरण विचित्र झाले होते, हे सचिन तेंडूलकरचे शहर होते. या सामन्यात शाहरुख खानसुद्धा मैदानात होता. स्टेडियम पुर्णपणे प्रेक्षकांनी भरले होते आणि सामन्यापूर्वी सचिन आणि माझे एकमेकांसोबत बोलणे झाले होते आणि आम्ही एकमेकांसोबत चांगल्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.’

तो म्हणाला, ‘मी या सामन्यात सचिनला दूसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले होते आणि त्याला बाद करणे ही माझी सर्वात मोठी चूक होती. मी फाइन लेगवर क्षेत्ररक्षण करत होतो आणि मला शिवीगाळ केली जात होती. यानंतर कर्णधार गांगुली मला म्हणाला की, तू मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण कर नाही, तर तुला हे लोक मारतील. तुला सचिनला बाद करायला कोणी सांगितले होते. ही मुंबई आहे. सामना झाल्यानंतर मुंबईच्या एक ही व्यक्ती मला काहीच म्हणाले नाहीत.’

यानंतर शोएब अख्तरने वानखेडे स्टेडियमवर एकही सामना खेळला नाही. तो फक्त २००८ मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता, त्यातही त्याने फक्त ३ सामने खेळले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अर्ध्यातूनच पंचांनी दिल्लीच्या धाकड गोलंदाजाला बॉलिंगपासून अडवले, ४ षटकांचा कोटाही नाही करू दिला पूर्ण

एका बाऊंसरने संपवले होते करियर, आता तब्बल ६० वर्षांनी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यातून काढली मेटल प्लेट

दिल्लीच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर फलंदाजांवर भडकला रिषभ पंत; म्हणाला, ‘फलंदाजीत आम्ही…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---