भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळापासून सध्याचा कर्णधार विराट कोहलीच्या काळापर्यंत अनेक प्रतिभावान खेळाडू भारतीय संघाला लाभले आहेत. त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना उत्तम कामगिरी करत संघाला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे.
नुकतेच माजी खेळाडू आकाश चोप्रा गांगुली (Sourav Ganguly) आणि विराटच्या (Virat Kohli) काळातील सर्वोत्तम अकरा खेळाडूंचा संघ निवडला. त्याचबरोबर त्याने दोघांमध्ये कागदावर लिखित स्पर्धा घडवली. तो म्हणाला, त्याचे मूल्यांकन असे आहे की गांगुलीचा संघ विराटच्या सध्याच्या संघाला पराभूत करेल.
त्या मूल्यांकनामध्ये, २०१९ विश्वचषकातील संघाप्रमाणेच २००३ विश्वचषकातील भारतीय संघही मजबूत आहे.
२००३ विश्वचषकातील भारतीय संघ
सौरव गांगुलीच्या नेतृत्वात २००३ मधील विश्वचषकात विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि स्वत: गांगुली यांसारख्या वरच्या फळीतील फलंदाजाचा समावेश होता. त्याचबरोबर फिरकीपटूंमध्ये अनुभवी हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे या दिग्गजांचा समावेश होता. शिवाय दिनेश मोंगिया सारख्या अष्टपैलूचाही समावेश होता. त्याचबरोबर झहीर खान, आशिष नेहरा, अजित आगरकर आणि अनुभवी गोलंदाज जवागल श्रीनाथ यांसारख्या अव्वल श्रेणीतील वेगवान गोलंदाजांची फळी होती.
गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ २००३ मधील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यात यशस्वी झाला. परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात पराभवाचे तोंड भारताला पहावे लागले.
२०१९ विश्वचषकातील भारतीय संघ
विराटच्या नेतृत्वात २०१९ च्या विश्वचषकातील भारतीय संघाच्या वरच्या फळीत शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल आणि स्वत: विराटचा समावेश होता. शिवाय अष्टपैलू म्हणून हार्दिक पंड्याचाही समावेश होता तसेच एमएस धोनीचाही यामध्ये समावेश होता. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजांचा समावेश होता तसेच फिरकीपटूंमध्ये युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाचा समावेश होता.
असे असूनही विराटच्या नेतृत्वात भारतीय संघ २०१९ मधील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचला. परंतु न्यूझीलंडबरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि स्पर्धेतून बाहेर झाला.
गांगुलीला मिळाला २०१९ विश्वचषकातील ३ खेळाडूंना २००३ विश्वचषकात घेऊन जाण्याचा टास्क
परंतु जर कोणताही पर्याय दिला गेला, तर दोन्ही कर्णधार एकमेकांच्या संघातील कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात घेतील का? हा प्रश्न एका चाहत्याने सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुलीला विचारला.
बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अपलोड केलेल्या या चॅट शोमध्ये एका चाहत्याने प्रश्न विचारला होता, “विश्वचषक २०१९च्या संघातील कोणतेही ३ खेळाडू निवडा, ज्यांना तुम्ही २००३ च्या विश्वचषक संघात ठेवायला आवडेल आणि यामागील कारण काय असेल?,” मयंक अगरवालने हा प्रश्न गांगुलीला वाचून दाखविला. मयंकदेखील या चॅट शोचा भाग होता.
गांगुलीने घेतले या ३ खेळाडूंचे नाव
गांगुलीने प्रत्युत्तर देत म्हटले, “विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह.” याचे कारण सांगताना गांगुली म्हणाला, “वेगवान गोलंदाज बुमराहची गुणवत्ता. आम्ही दक्षिण आफ्रिकेत खेळलो, तरीही आम्ही त्या मालिकेत चांगली गोलंदाजी केली. सलामीला रोहित आणि मी ३ ऱ्या क्रमांकावर मी असेल. मला माहीत नाही की कदाचित सेहवाग हे ऐकत आहे आणि मला उद्या एक फोन येईल.” परंतु मी या तिघांना संघात सामील करणार.
गांगुलीने पुढे म्हटले, की जर इतर कोणता पर्याय दिला, तर तो माजी कर्णधार एमएस धोनीला निवडेल. तो म्हणाला, “धोनीही. परंतु जेव्हा तुम्ही मला ३ पर्याय दिले आहेत, तर मी स्टंपच्या मागे राहुल द्रविडकडून काम चालवून घेईल. कारण मला वाटते की त्याने विश्वचषकात उत्तम कामगिरी केली आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-या ४ भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं, ज्यांना मिळवता आले नाही वडिलांसारखे यश
-टीम इंडियाच्या विजयाचा रथ ‘हा’ संघ रोखणार, माजी खेळाडूचा दावा
-सचिन म्हणतो; फक्त आचरेकर सर नाहीत, हे २ लोकंही माझे आहेत गुरु