भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जवळजवळ 11 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सराव सत्रात पुन्हा एकदा बॅट हातात घेत त्याच्या फलंदाजीची झलक दाखवली आहे.
गांगुलीला ‘गॉड ऑफ ऑफ साइड'(ऑफ साइडला सर्वोत्तम फलंदाजी) असे संबोधले जाते. पण त्याला असे का म्हणतात याचा प्रत्यय त्याची या सराव सत्रातील फलंदाजी पाहुन येतो.
त्याने दिल्लीच्या सराव सत्रात फलंदाजी करताना त्याच्या खास शैलीत कट शॉट्स, कव्हर ड्राईव्ह असे फटके खेळले आहेत. याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘गांगुलीने ठरवले की काळाला थोडे मागे घेऊन जाऊ.
या व्हिडिओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक आणि गांगुलीचा माजी संघ सहकारी मोहम्मद कैफही दिसत आहे. तो यावेळी थ्रो घेत होता.
कोलकता नाईट रायडर्स, पुणे वॉरीयर्स अशा संघांसाठी खेळलेला गांगुली हा सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार आहे.
So…@SGanguly99 decided to turn back the ⏰
RT if the 90s kid in you still cherishes those drives and cuts. #ThisIsNewDelhi #DelhiCapitals pic.twitter.com/dfOq6hOytD
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 28, 2019
गांगुलीने त्याच्या आंतरराष्ट्री कारकिर्दीत 311 वनडे सामने खेळले असून यात त्याने 22 शतके आणि 72 अर्धशतकांसह 41.02 च्या सरासरीने 11,363 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तो 113 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतकांच्या मदतीने 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत.
तसेच गांगुलीने आयपीएलमध्ये 59 सामनेही खेळले आहेत. यात त्याने 25.45 च्या सरासरीने 1349 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुंबई इंडियन्सच्या संघात या नवीन खेळाडूचा झाला समावेश, जाणून घ्या कारण
–आयपीएल २०१९: आज पंजाबकडून पदार्पण केलेला कोण आहे वरुण चक्रवर्ती…






