या महिन्यात दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी आज(2 मार्च) दक्षिण अफ्रिकेने 15 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे.
या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व नवीन कर्णधार क्विंटॉन डी कॉक करणार आहे. तसेच या संघात दक्षिण आफ्रिकेने डावकरी फिरकीपटू जॉर्ज लिंडेला पहिल्यांदाच संधी दिली आहे. त्यामुळे त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते.
त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा नियमित फिरकीपटू ताब्राईज शम्सी या मालिकेच्या संघ निवडीसाठी उपलब्ध नव्हता. त्याची पत्नी काही दिवसातच त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म देणार असल्याने त्याने या मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेतून आधीच बाहेर पडला आहे.
याबरोबरच दक्षिण आफ्रिकेच्या संघात तेंबा बाऊमा, फाफ डु प्लेसिस, रस्सी व्हॅन दर दसेन, हेन्रीच क्लासेन हे फलंदाज आहेत. तर डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स हे अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर अँडिल फेहलुक्वायो, लुंगी एन्गिडी, एन्रीच नॉर्जे, केशव महाराज असे गोलंदाज दक्षिण आफ्रिका संघात आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 12 मार्चपासून ही वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना धरमशाला येथे होणार आहे. त्यानंतर 15 मार्चला लखनऊ येथे दुसरा वनडे सामना होईल. तर तिसरा वनडे सामना 18 मार्चला कोलकाता येथे होणार आहे.
Quinton de Kock (c, wk), Temba Bavuma, Rassie van der Dussen, Faf du Plessis, Kyle Verreynne, Heinrich Klaasen, David Miller, Jon-Jon Smuts, Andile Phehlukwayo, Lungi Ngidi, Lutho Sipamla, Beuran Hendricks, Anrich Nortje, George Linde, Keshav Maharaj. #ProteaFire #INDvSA pic.twitter.com/NL8SklhWsU
— Proteas Men (@ProteasMenCSA) March 2, 2020
भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ –
क्विंटॉन डी कॉक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), तेंबा बाऊमा, रस्सी व्हॅन दर दसेन, फाफ डू प्लेसिस, काईल वेरिन, हेन्रीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एन्गिडी, लुथो सिपाम्ला, ब्यूरान हेन्ड्रिक्स, एन्रीच नोर्जे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराटचं असं वागणं बरं नव्हं! आता या व्यक्तीवर काढला पराभवाचा राग
–असे झाले थाला धोनीचे चेन्नईमध्ये स्वागत, पहा व्हिडिओ
–जेव्हा कॅप्टन कोहली बनतो गोलंदाज, पहा व्हिडिओ