विश्वचषक 2023 स्पर्धा अवघ्या 2 सामन्यांची पाहुणी आहे. कारण, स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. तसेच, बादफेरीतील पहिला उपांत्य सामनाही पार पडला आहे, जो भारताने 70 धावांनी जिंकला. आता स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एक बदल केला आहे. लुंगी एन्गिडी याच्या जागी तबरेज शम्सी याची एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघात दोन बदल आहेत. मार्कस स्टॉयनिस आणि सीन ऍबॉट बाहेर पडले असून त्यांच्या जागी ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क संघात परतले आहेत.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यां संघांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. खरं तर, त्यांच्या विजयाची आणि पराभवाची संख्या एकसारखी आहे. या दोन्ही संघांनी विश्वचषकातील 9 सामने खेळताना 7 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, पॉईंट्स टेबलमध्ये थोडा बदल आहे. साखळी फेरी संपल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेने 14 गुण आणि +1.261 नेट रनरेटसह दुसरे स्थान मिळवले. तसेच, ऑस्ट्रेलियानेही 14 गुण आणि +0.841 नेट रनरेटसह तिसरे स्थान मिळवले. यात दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट जास्त असल्यामुळे ते टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी राहिले. संपूर्ण स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने आव्हानाचा बचाव करताना विजय मिळवले आहेत, तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे. अशात या सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (South Africa have won the toss and have opted to bat against australia cwc 23 semi final 2)
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, जेराल्ड कोएट्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
ऑस्ट्रेलिया
ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड
हेही वाचा-
‘मी तसे करायला नको होते…’, विश्वविक्रमी गोलंदाजी प्रदर्शनानंतर असे का म्हणाला शमी? लगेच वाचा
फायनलचं स्वप्न भंगताच विलियम्सन निराश, पण रोहितसेनेचं कौतुक करत म्हणाला, ‘भारत या विजयाचा हक्कदार…’