बुधवारचा (दि. 15 नोव्हेंबर) दिवस 140 कोटी भारतीयांना सुखावणारा ठरला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला 70 धावांनी पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. भारताने हा कारनामा मोहम्मद शमी याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर केला. शमीने सामन्यात 7 विकेट्स घेतल्या, ज्यामुळे भारताच्या 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 48.5 षटकात 327 धावांवरच सर्वबाद झाला.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला अभिमानास्पद कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर त्याने म्हटले की, “मी माझ्या संधीची वाट पाहत होतो. मी जास्त मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळलो नव्हतो. माझे पुनरागमन न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे झाले होते. आम्ही वेगळेपणाविषयी बोलत आहोत, पण मी अजूनही चेंडू पीच करणे आणि नवीन चेंडूने विकेट घेणे यावर विश्वास ठेवतो.”
भारती गोलंदाजाने सांगितले की, त्याला केन विलियम्सन (Kane Williamson) याचा झेल सोडण्याचे दु:ख होते. त्यामुळे त्याची विकेट घेतल्याने त्याचे समाधान झाले. शमी म्हणाला, “मी विलियम्सनचा झेल सोडला होता. मी तसे करायला नको होते. त्यावेळी खूप वाईट वाटले. चेंडूतून गती बाजूला करण्यावर माझे लक्ष होते. जर फलंदाज हवेत शॉट खेळण्यासाठी गेला, तर आमच्याकडे विकेट घेण्याची संधी असेल. आम्हाला तसे करायचे होते. इथे वेगळेपण नक्कीच कामी आले.”
खेळपट्टीविषयी बोलताना शमी म्हणाला की, “खेळपट्टी खूप चांगली होती. दुपारी इथे खूप धावा बनल्या होत्या. दवाची जरा भीती होती, खेळपट्टीवरून गवत कापले होते. जर तिथे दव असते, तर चेंडू स्किड झाला असता आणि धावा बनवण्याची संधी वाढली असती. मी माझ्या प्रदर्शनाने खुश आहे.”
शमीने आपले गुपीत सांगत म्हटले की, “मागील दोन विश्वचषकात आम्ही उपांत्य सामन्यात हारलो होतो. कोणाला माहिती आम्हाला पुढची संधी केव्हा मिळेल, तेव्हा आम्हाला सर्व गोष्टी एकाच वेळी मिळालेल्या संधीमध्ये करायच्या होत्या. आम्ही ही संधी हातातून जाऊ द्यायची नव्हती.”
शमीचे प्रदर्शन
खरं तर, मोहम्मद शमी याने एकाच षटकात केन विलियम्सन (69) आणि टॉम लॅथम (0) यांची विकेट घेऊन सामन्याची दिशा बदलली होती. शमीने त्याच्या धोकादायक गोलंदाजीने भारताला फायदा मिळवून दिला. भारतााल अंतिम सामन्यात पोहोचवण्यात शमीने सिंहाचा वाटा उचलला. तसेच, त्याने कोणत्याही भारतीयाने एका वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही नावावर केला. शमीने या सामन्यात 9.5 षटके गोलंदाजी केली. त्याने यावेळी 57 धावा खर्च करत 7 विकेट्स नावावर केल्या. (world Cup 2023 pacer mohammed shami says don t want let go chance of winning ind vs nz )
हेही वाचा-
फायनलचं स्वप्न भंगताच विलियम्सन निराश, पण रोहितसेनेचं कौतुक करत म्हणाला, ‘भारत या विजयाचा हक्कदार…’
ना विराट, ना शमी, ना श्रेयस! टीम इंडियाच्या विजयाचा खरा हिरो रोहितच; पाहा कुणी केलंय भाष्य