जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघ्या 20 दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, हा हंगाम सुरू होण्याआधी सर्वसंघांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येतेय. स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळणार असल्याने आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीत.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने नुकतेच जाहीर केले आहे की, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्या दरम्यान होणाऱ्या दोन सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्व प्रमुख खेळाडू सहभागी होणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना 31 मार्च रोजी तर दुसरा सामना 2 एप्रिल रोजी खेळला जाईल. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू चार एप्रिलपासून आयपीएलमध्ये दिसतील. आयपीएलचा पहिला सामना 31 मार्च रोजी खेळला जाईल. 3 एप्रिलपर्यंत प्रत्येक संघ प्रत्येकी एक सामना खेळलेला असेल.
दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू उशिराने स्पर्धेत सहभागी झाल्यास याचा तोटा प्रामुख्याने सहा संघांना होईल. सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असलेल्या ऐडन मार्करम याच्याकडे आहे. त्याच्यासह अष्टपैलू मार्को जेन्सन हा सनरायझर्स संघाचा भाग आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज एन्रिक नोर्कीए व लुंगी एन्गिडी, मुंबई इंडियन्सचे डेवाल्ड ब्रेविस आणि ट्रिस्टन स्टब्स, पंजाब किंगचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, लखनऊ सुपरजायंट्सचा क्विंटन डी कॉक व गतविजेता गुजरात टायटन्सचा डेव्हिड मिलर हे आपापल्या संघासाठी पहिला सामना खेळणार नाहीत.
राजस्थान रॉयल्ससाठी खेळणारा डोनोवन फेरेरा हा राष्ट्रीय संघाचा भाग नसल्याने आयपीएलच्या सुरुवातीपासून दिसू शकतो.
(South Africa players Might Miss IPL First Week. Due To National Duties Markram Miller Rabada Miss First Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“मला आऊट व्हायचे नव्हते”, दमदार शतकानंतर ख्वाजाने सांगितला आपला गेमप्लॅन
स्टीव्ह ‘फेल’ स्मिथ! चांगल्या सुरवातीनंतरही संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरलाय ऑसी कर्णधार