---Advertisement---

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी असा असू शकतो दक्षिण आफ्रिकेचा ११ जणांचा संघ

On: गुरूवार, मे 30, 2019 2:05 PM
---Advertisement---

आजपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये आयसीसीच्या 12 व्या क्रिकेट विश्वचषकाला प्रारंभ होत आहे. या विश्वचषकातील सलामीचा सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर होणार आहे.

या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे.

पण त्याची अनुपस्थिती असली तरी दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी हे दोन वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतात. त्याचबरोबर त्यांना ऍन्डिल फेहलुकवायो साथ देईल. तर फिरकी गोलंदाजी 40 वर्षीय इम्रान ताहीरसह चायनामन गोलंदाज ताब्राईज शम्सी सांभाळताना दिसू शकतो.

तर फलंदाजांच्या फळीत कर्णधार फाफ डु प्लेसिससह अनुभवी हाशिम आमला, जेपी ड्यूमिनी असतील. तसेच रस्सी वॅन दर दसेनलाही आजच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. तर यष्टीरक्षणाची जबाबदारी क्विंटन डी कॉक सांभाळताना दिसेल.

इंग्लंड विरुद्ध असा असू शकतो दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ – 

हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, रस्सी वॅन दर दसन, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर, एँडिल फेहलूकवायो, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, इम्रान ताहिर, ताब्राईज शम्सी.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: खेळाडू म्हणून नाही तर क्रिकेटच्या या क्षेत्रात पदार्पण करतोय सचिन तेंडुलकर!

इंग्लंडचा हा गोलंदाज म्हणतो, ‘मी भारतीय असतो तर इशांत शर्मा झालो असतो’

विश्वचषकादरम्यान विराटबरोबर फोटो काढण्याची चाहत्यांना रोज मिळणार संधी, जाणून घ्या कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment